अपंग शेतकऱ्याने केली कलिंगडाची शेती

By admin | Published: March 15, 2015 11:45 PM2015-03-15T23:45:57+5:302015-03-16T00:07:13+5:30

बालवयातच नशीबी अपंगत्व आले कुठल्याही परिस्थितीत शिक्षण घ्यायचे. या जिद्दीने शिक्षण पूर्ण झाल्यावर रुपेशने मंडणगड सोडले व दापोली तालुक्यातील दाभोळ - पंचनदी गाठले. तेथे

The disabled farmer has done farming farming | अपंग शेतकऱ्याने केली कलिंगडाची शेती

अपंग शेतकऱ्याने केली कलिंगडाची शेती

Next

शिवाजी गोरे - दापोली -दोन्ही पायाने अपंग परंतु परावलंबी जीवन जगायचे नाही. आपण अपंग असलो तरीही मनगटात बळ आहे. त्या जोरावर इतरांप्रमाणे काम करु शकतो. अपंगत्त्व आले म्हणून रडत बसण्यापेक्षा त्यावर मात रुन जगू शकतो, अशी उमेद उराशी बाळगून अपंग शेतकरी रुपेश पवार यांनी दिवसरात्र कष्ट करुन जिद्दीने कलिंगड शेती केली आहे.
बालवयातच नशीबी अपंगत्व आले असले तरीही कुठल्याही परिस्थितीत शिक्षण घ्यायचे. या जिद्दीने गावातील शिक्षण पूर्ण झाल्यावर रुपेश पवार याने विने तालुका मंडणगड सोडले व दापोली तालुक्यातील दाभोळ - पंचनदी गाठले. तेथे मित्राच्या सहाय्याने १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नोकरीसाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, नोकरी मिळाली नाही त्यामुळे निराश न होता गावातच शेती करण्याचा निर्णय त्याने घेतला. त्यातच १२ वर्षांपूर्वी वडीलांचे निधन झाले. म्हातारी आईची उदरनिर्वाहाची जबाबदारी येऊन पडली. दोन्ही पायाने अपंग असणारा रुपेश कुटुंबाचा पोशिंदा बनला.
विने येथील २ एकर वडिलोपार्जित शेतीत भात- नाचणीचे पीक घेत असताना, दुबार पीक पद्धतीची कल्पना रुपेशच्या डोक्यात आली. केवळ भात पीक घेऊन थांबायचे नाही. आता उन्हाळी शेतीसुद्धा करायची, पावटा, चवळी पिक घेतले जाते. कोकणातील शेतकरी भातपीकावर समाधान मानतो. पेण, पनवेल व परप्रांतीय शेतकरी येवून मंडणगड तालुक्यात कलिंगड शेती करीत आहेत. आपणसुद्धा यावर्षी कलिंगड शेती करायची अशी खुणगाठ मनाशी बांधून, दोन एकर शेतीत कलिंगडाची गोल्डन जात लावण्याचे ठरवले.
त्यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत कलिंगडाची गोल्डन जातीची लागवड केली. कृषी विभागाने मोफत खत, बियाणे, किटकनाशके पुरवली. त्यामुळे, आपण यशस्वी झालो अशी भावना त्यांच्या मनात आहे. परंतु त्याहीपेक्षा त्यांची जिद्द व सकारात्मक मानसिकता फार महत्त्वाची आहे.
कलिंगड शेतीसाठी भांडवल नसतानासुद्धा रुपेशने दाखवलेले धाडसाचे गावकऱ्याने कौतुक केले. तसेच गावकऱ्याने रुपेशला आर्थिक मदत करण्याचे ठरवले. मित्र परिवार व गावकऱ्याने मिळून दोन एकरच्या कलिंगड लागवडीसाठी आर्थिक मदत केली. त्याच्या जोरावर पवार यांना हत्तीचे बळ मिळाले. अपंग असलो तरीही मनाने खंबीर असल्याचे रुपेशने गावकऱ्यांना दाखवून दिले.

कलिंगड शेती करताना आई सरस्वती पवार, बहिण सुरेखा महाडीक, भाचा समीर महाडिक यांची मदत लाभली. कलिंगड शेतीबरोबर बीट, गाजर, वांगी, मका, काकडी याची लागवड करुन दुबार पीक पद्धतीचा प्रयत्न सुरु आहे. शेतीतील कलिंगड व भाजी मी स्वत: बाजारात जाऊन विकतो. कृषी विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले. आत्मा योजनेंतर्गत मदत मिळाली. वेळोवेळी प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावर्षी कलिंगडाचे चांगले उत्पन्न मिळेल असे वाटत असताना अचानक अवकाळी पाऊस झाला व आशेवर पाणी फेरले गेले.
- रुपेश पवार, उत्पादक.

Web Title: The disabled farmer has done farming farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.