विजेचा प्रश्न, मात्र स्थानिक भाजपमधील मतभेद उघड; संजू परब यांनी कान टोचले
By अनंत खं.जाधव | Published: May 31, 2024 02:55 PM2024-05-31T14:55:11+5:302024-05-31T14:56:17+5:30
सावंतवाडी : सावंतवाडी येथे विजेच्या प्रश्नावरून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत प्रिपेड वीज मिटर वरून अॅड. संदिप निंबाळकर यांनी भाजप ...
सावंतवाडी: सावंतवाडी येथे विजेच्या प्रश्नावरून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत प्रिपेड वीज मिटर वरून अॅड. संदिप निंबाळकर यांनी भाजप नेत्यांच्या समोरच सरकार विरोधी मत मांडल्यानंतर आता भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी बैठकीला गेलेल्या भाजप नेत्याचे कान टोचले आहेत.
भाजप सत्तेत असतना सर्वपक्षीय बैठकीत तुम्ही गेलात कशाला पालकमंत्री रविंद्र चव्हाण व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी तालुका मंडल अध्यक्ष महेश धुरी उपस्थित होते.
सावंतवाडीत गुरूवारी विज समस्या सोडविण्याबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली या बैठकीत प्रिपेड विज मिटर वरून अॅड. निंबाळकर यांनी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांना प्रिपेड वीज मिटर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बसवू देणार नाही असा पवित्रा घेत थेट सरकार वरच हल्ला चढवला यावेळी तेथे उपस्थित असलेले माजी आमदार राजन तेली विशाल परब अजय गोंदावळे यांच्यासह भाजप पदाधिकारी शांत होते.त्यावरून जिल्हा उपाध्यक्ष संजू परब मात्र चांगलेच आक्रमक झाले असल्याचे दिसून आले.
भाजप पक्ष सक्षम असून अशा सर्व पक्षीय आंदोलने करण्यापेक्षा भाजप नेत्यांनी स्वतंत्र पणे हा प्रश्न हाताळला पाहिजे ज्यांनी लोकसभा निवडणुकीत आमचे नेते नारायण राणे यांच्यावर टिका केली त्याच्या सोबत आमचे पदाधिकारी जाऊन बसतात अशा शब्दांत परब यांनी नाराजीचा सूर आळावला तसेच मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच बबन साळगावकर यांनी सावंतवाडी शहरासाठी आलेले ११ कोटी रूपये परत घालवले ते आज विजेच्या प्रश्नासाठी एकत्र येतात ही मोठी शोकांतिका असून विजेच्या प्रश्नात आम्ही जनतेसोबत आहोत पण पालकमंत्र्यासह आमच्या सत्ताधाऱ्यांवर टिका करत असलेल्यांना सोबत घेणाऱ्यांना माफ करणार नसल्याचे ही परब म्हणाले.
सावंतवाडीचे प्रश्न स्थानिक सोडवतील
सावंतवाडीचे प्रश्न स्थानिक सोडवतील त्यासाठी बाहेरील व्यक्तीनी सावंतवाडी मतदारसंघात येऊन लुडबुड करण्याची गरज नाही असे ही परब यावेळी म्हणाले