दोडामार्ग सभापतींवर अविश्वास

By admin | Published: April 1, 2016 10:54 PM2016-04-01T22:54:11+5:302016-04-02T00:07:33+5:30

मनमानी कारभाराचा ठपका : जिल्हाधिकाऱ्यांकडे ठराव दाखल

Disbelief on Doddama Speaker | दोडामार्ग सभापतींवर अविश्वास

दोडामार्ग सभापतींवर अविश्वास

Next

सिंधुदुर्गनगरी : भाजपचे दोडामार्ग सभापती महेश गवस यांच्यावर मनमानी कारभाराचा ठपका ठेवत त्यांच्याविरूद्ध पंचायत समितीमधील त्यांच्या पक्षासह विविध पक्षांच्या पाचपैकी पाचही सदस्यांनी अविश्वास ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. आता जिल्हाधिकारी अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी विशेष सभा बोलवणार असून त्यानंतर अविश्वास ठरावावर शिक्कामोर्तब होणार आहे.दोडामार्ग पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे तीन, कॉँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनाचा प्रत्येकी एक सदस्य निवडून आला होता. सव्वा वर्षापूर्वी भाजपाचे दोडामार्ग पंचायत समिती सदस्य महेश गवस तीन विरूद्ध दोन अशा मतांनी सभापतीपदी विराजमान झाले होते. परंतु गेल्या सव्वा वर्षात दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतींवर भाजपसह सर्व पक्षाचे सदस्य नाराज होते. त्यातच सभापती महेश गवस यांच्या मनमानी कारभाराविरोधात सर्वपक्षीय एकवटले व एक विरद्ध पाच असा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला.
जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, कॉँग्रेसचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रेमानंद देसाई, दोडामार्गच नगराध्यक्ष संतोष नानचे यांच्यासोबत शुक्रवारी दोडामार्ग पंचायत समितीचे सदस्य जनार्दन गोरे, आनंद रेडकर, सुचित्रा दळवी, विशाखा देसाई, सीमा जंगले यांनी सभापती गवस यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अविश्वास ठरावासाठी पंचायत समितीची विशेष सभा घेण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)

खुर्चीतून उठविल्याचा वाद भोवला
जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी दोडमार्ग पंचायत समितीला भेट दिली होती. या भेटीत नाडकर्णी सभापतींच्या खुर्चीत बसले होते. त्या खुुर्चीतून नाडकर्णी यांना उठवल्याने वाद निर्माण झाला होता. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला होता. हाच वाद गवस यांना भोवल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Disbelief on Doddama Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.