चर्चा फक्त मोर्चा अन् मोर्चाचीच !

By admin | Published: October 24, 2016 12:06 AM2016-10-24T00:06:57+5:302016-10-24T00:06:57+5:30

वैभववाडीत शुकशुकाट : अन्य समाज घटकांनी व्यवसाय ठेवले बंद

Discussion only rallies and rallies! | चर्चा फक्त मोर्चा अन् मोर्चाचीच !

चर्चा फक्त मोर्चा अन् मोर्चाचीच !

Next

वैभववाडी : सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित केलेल्या सकला मराठा क्रांती (मूक) मोर्चात वैभववाडीतून रणरागिणी, आबालवृद्धांसह हजारो मराठा बांधव सहभागी होण्यास गेले. त्यामुळे बाजारपेठत पूर्णत: शुकशुकाट होता. त्यामुळे दिवसभर शहरात मोर्चाची चर्चा आणि उपस्थितीच्या आकड्याचे कुतूहल होते. सकल मराठ्यांसह पाठिंबा दिलेल्यांपैकी अन्य काही समाज घटकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते. त्यामुळे जवळपास निम्मी बाजारपेठ बंद होती.
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीसाठी जवळपास महिनाभर विविध स्तरावर नियोजन सुरू होते. विभागवार बैठका, गाववार दौरे, मेळावे, जनजागृती रॅली, आदींच्या माध्यमातून मराठा क्रांती मोर्चा भारदस्त करण्यासाठी अनेकांनी अहोरात्र
परिश्रम घेतले. त्यामुळे भात कापणीचा हंगाम जोरात सुरू असतानाही जातीचा अभिमान आणि सामाजिक अस्मिता जपण्यासाठी रणरागिणी, वृद्ध, युवकांसह हजारो मराठा बांधव क्रांती मोचार्साठी दिवस उजाडताच घराबाहेर पडले.

४सकाळी सात वाजल्यापासूनच मोर्चेकऱ्यांनी सिंधुदुर्गनगरीची दिशा धरली होती. त्यामुळे एरव्ही बाजारपेठ उघडण्याच्यावेळी असणारा शुकशुकाट मोर्चामुळे रविवारी सकाळीच कलकलाटात परावर्तित झालेला पाहायला मिळाला.
४सकाळीच सुरू झालेली वाहनांची रेलचेल दहानंतर मंदावली. अकरानंतर वैभववाडी, उंबर्डे, भुईबावडा बाजारपेठांसह महत्त्वाच्या ठिकाणांवर शुकशुकाटच होता. दररोज गजबजणारे वाहनतळ आणि चौक काहिसे निर्जन झाले होते.
४मोजकीच दुकाने उघडी होती.
त्यामुळे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांसह मोक्याच्या ठिकाणी लावलेले भगवे झेंडे लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे फारशी वर्दळ नसतानाही नाक्यानाक्यांवर मोर्चाची चर्चा ऐकायला मिळत होती.

\मोर्चा यशस्वी झाल्याचे तेज
मोर्चा सुरू झाला का?, मोर्चात कोण कोण सहभागी झालेत? भाषणे कोणी केली, मोर्चेकऱ्यांचा आकडा कितीवर गेला? मोर्चा संपला का? या आणि अशा अनेक बाबींचे कुतूहल मोर्चाला न गेलेल्यांमध्ये होते. त्यामुळे दर अर्धा-पाऊण तासाने प्रत्येकजण मोर्चाला गेलेल्या आपल्या जवळच्याकडून मोर्चाचे अपडेट्स घेत होते. इतकेच नव्हे तर मोर्चातील 'ड्रोन'बाबतही संवाद रंगले होते. दुपारी साडेतीननंतर मोर्चेकरी हळूहळू परतू लागल्याने संध्याकाळी बाजारपेठा पूर्वपदावर आल्या. मोर्चाहून परतलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मोर्चा यशस्वी झाल्याचे तेज दिसत होते.
 

Web Title: Discussion only rallies and rallies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.