सावंतवाडी सभापतींवर लवकरच अविश्वास ठराव

By admin | Published: November 30, 2015 11:12 PM2015-11-30T23:12:00+5:302015-12-01T00:18:36+5:30

अशोक दळवी : पंचायत समितीच्या मासिक बैठकीतून शिवसेनेचा सभात्याग

Dismissal Resolution soon on Sawantwadi Speaker | सावंतवाडी सभापतींवर लवकरच अविश्वास ठराव

सावंतवाडी सभापतींवर लवकरच अविश्वास ठराव

Next

सावंतवाडी : वेर्ले येथील शौचालय घोटाळ््यावरून शिवसेना सदस्य चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी पंचायत समिती बैठकीतून सभात्याग केला. तसेच लवकरच सभापतींवर अविश्वास ठराव आणणार असल्याचे जाहीर केले. वेर्ले येथील शौचालय घोटाळ्याची नोंद इतिवृत्तात केली नसल्याचा आरोपही यावेळी शिवसेना सदस्यांनी केला. त्यांना भाजपच्या एकमेव सदस्याने पाठिंबा दिला.
सोमवारच्या पंचायत समिती बैठकीत वेर्ले येथील शौचालय घोटाळ्याचा अहवाल मांडण्यात येणार होता. त्यावरून शिवसेना व काँग्रेसमध्ये खडाजंगी होणार, अशी चिन्हे होती. त्याला बैठकीवेळी ठळक पुष्टी मिळाली.या बैठकीला सुरूवात झाल्यानंतर सभा शास्त्रानुसार इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. मात्र, या इतिवृत्तात वेर्ले येथील शौचालय घोटाळ्याचा विषय नसल्याने शिवसेना सदस्य चांगलेच आक्रमक झाले. आम्ही दिलेले विषय सभागृहात मांडले जात नसतील, तर आमची गरज काय, असा सवाल करीत शिवसेनेने सभात्याग केला.यावेळी अशोक दळवी म्हणाले, वेर्ले भ्रष्टाचार प्रकरणाची माहिती दिली जात नाही आणि जाणूनबुजून ठराव डावलले जात आहेत. वेर्लेचे प्रकरण ठरावात येणे गरजेचे असून सुध्दा घेतले जात नाही. शिवसेना-भाजपचे आठ सदस्य सभागृहात असून काँग्रेसचे फक्त चार सदस्य आहेत. त्यामुळे हा ठराव घेतला जावा, अशी मागणी केली व सभागृहाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सभापती प्रमोद सावंत यांनी काही काळ सभागृह चालवले, पण सदस्यांच्या संख्येअभावी कोणताही निर्णय घेतला नाही. यावेळी माजी सभापती प्रियंका गावडे, गौरी आरोंदेकर, स्वप्नील नाईक हे काँग्रेसचे तीनच सदस्य उपस्थित होते.तर शिवसेनेचे अशोक दळवी, पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत, लाडोबा केरकर, रोहिणी गावडे, वर्षा हरमलकर, पार्वती हिराप व भाजपच्या सदस्या श्वेता कोरगावकर आदी उपस्थित होत्या.यानंतर शिवसेना गटनेते अशोक दळवी यांनी सांगितले की, पंचायत समितीत एककल्ली कारभार सुरू असून विरोधी पक्षाला डावलले जात आहे. आम्ही याबाबत लवकरच वरिष्ठ नेते मंडळीशी विचारविनिमय करून सभापतींवर अविश्वास ठराव दाखल करणार असून वेर्लेमध्ये झालेल्या भ्रष्टाचारात काँग्रेसची साखळी सहभागी असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)

कारवाई करणार : तालुक्यातही भ्रष्टाचार
वेर्ले येथे शौचालयामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्यातील दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, वेर्ले प्रमाणे तालुक्यातही शौचालय वाटपात भ्रष्टाचार झाला असून, हा आकडा कोटीच्या घरात असल्याचे शिवसेना सदस्यांनी सांगितले. याबाबतही आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आयुक्तांकडे दाद मागणार असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही अशोक दळवी यांनी सांगितले.
वेर्ले येथील शौचालय भ्रष्टाचारात सर्व यंत्रणा सहभागी झाली असून, मुळात १२ लाखाच्या धनादेशावर सही कोणी केली हे पाहणे गरजेचे आहे. गटविकास अधिकारी मोहन भोई यांनी या धनादेशावर सही केली. मग त्यांना हा भ्रष्टाचार दिसला नाही का? त्यांनी का तपासणी केली नाही? मग कोणत्या आधारे समिती नेमली गेली? असे सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करीत या प्रकरणी सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे मतही यावेळी शिवसेना गटनेत्यांनी व्यक्त केले.

Web Title: Dismissal Resolution soon on Sawantwadi Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.