गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेर्गंत ४१ अपघातग्रस्तांच्या वारसांना ८० लाख विमा रक्कमेचे वाटप 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 5, 2023 08:09 PM2023-04-05T20:09:41+5:302023-04-05T20:09:50+5:30

महेश सरनाईक  सिंधुदुर्ग  : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबास शासनाकडून आर्थिक लाभ देण्यात ...

Distribution of 80 lakh insurance amount to heirs of 41 accident victims under Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेर्गंत ४१ अपघातग्रस्तांच्या वारसांना ८० लाख विमा रक्कमेचे वाटप 

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेर्गंत ४१ अपघातग्रस्तांच्या वारसांना ८० लाख विमा रक्कमेचे वाटप 

googlenewsNext

महेश सरनाईक 

सिंधुदुर्ग  : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबास शासनाकडून आर्थिक लाभ देण्यात येतो. या योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०२२-२३ मध्ये खंडित कालावधीतील एकूण ४१ प्रकरणे मंजूर करण्यात आली असून संबंधित अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना  ८० लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी दिली.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०२२-२३ मध्ये  खंडित कालावधीतील एकूण ७८अर्ज दाखल करण्यात आले. त्यापैकी  तालुकानिहाय कणकवली -१०, वेंगुर्ला-५, देवगड-४, मालवण-८, वैभववाडी-२, सावंतवाडी -६, दोडामार्ग-२ व कुडाळ-४ अशी एकूण ४१ प्रकरणे मंजूर करण्यात आली. तसेच यामध्ये अपघातामुळे अपंगत्व आलेल्या २ व्यक्तींचा समावेश आहे. तर ३९ व्यक्तींचा अपघाती मृत्यू झालेला आहे.  संबंधित शेतकऱ्यांच्या वारस लाभार्थींना ८० लाख रुपये विमा रक्कमेचे वाटप करण्यात आलेले आहे. उर्वरीत ३७ प्रकरणे  छाननी प्रक्रियेमध्ये आहेत.

शेती व्यवसाय करतांना होणाऱ्या विविध अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास तसेच अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास दोन लक्ष रुपये तर एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लक्ष रुपये अनुदान शासनाकडून देण्यात येते.

अपघाती मृत्यू प्रकरणी शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासकीय अनुदान देण्याकरीता शासनाकडून एका वर्षाच्या कालावधीकरीता विमा कंपनीची नियुक्ती केली जाते. सदर विमा कालावधी संपुष्ठात आल्यावर दुसऱ्या कंपनीची नियुक्ती होईपर्यंतचा कालावधी हा खंडीत कालावधी म्हणून गणला जातो. अशा खंडित कालावधीतील विमा दावे आयुक्तालय स्तरावर सादर करण्यात येतात. 

रस्ता, रेल्वे अपघात, उंचावरून पडून मृत्यु, पाण्यात बुडून मृत्यु, नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हत्या, सर्पदंश, विंचूदंश, वीज पडून मृत्यु, इलेक्ट्रिक शॉक, अपघाती विषबाधा, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यु इत्यादी. अपघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यु किंवा अपंगत्व आल्यास वारसदारांना लाभ देण्यात येतो. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये क्लेम फॉर्म भाग -१ व सहपत्र, क्लेम फॉर्म भाग २ (अ) व (ब),क्लेम फॉर्म भाग -३,सातबारा उतारा,६ क (वारस नोंद उतारा),६-ड (फेरफार उतारा),वयाचा पुरावा (स्वयंसाक्षांकित प्रत), शिधापत्रिका (स्वयंसाक्षांकित प्रत), मृत्यु दाखला, अपंगत्वाचा दाखला (स्वयंसाक्षांकित प्रत), प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) (स्वयं साक्षांकित प्रत), घटनास्थळ पंचनामा (स्वयंसाक्षांकित प्रत), पोलिस पाटील माहिती अहवाल (एफआयआर नसल्यास), इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, व्हिसेरा अहवाल (आवश्यक असल्यास), वाहन परवाना (आवश्यक असल्यास),बँक पासबुक (झेरॉक्स प्रत), अपंगत्वाच्या टक्केवारीचे प्रमाणपत्र व फोटो, नावात/आडनावात बदल असल्यास प्रतिज्ञापत्र या योजनेंतर्गत केवळ सातबारावर नाव असलेल्या संबंधित व्यक्तिलाच नव्हे सातबारावर नाव नसलेल्या कुटुंबातील इतर सदस्याचा अपघात किंवा अपंगत्व आल्यास वरीलप्रमाणे लाभ देण्यात येतो.

Web Title: Distribution of 80 lakh insurance amount to heirs of 41 accident victims under Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.