नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे बियाणे वाटप

By admin | Published: October 16, 2015 08:57 PM2015-10-16T20:57:34+5:302015-10-16T22:39:11+5:30

मदतीचा हात : गंगापूर सोहळ्यात ५२ शेतकऱ्यांना सहाय्य; मराठवाड्यात दुष्काळाची छाया

Distribution of seeds by Narendrabaryaji Maharaj Institute | नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे बियाणे वाटप

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे बियाणे वाटप

Next

रत्नागिरी : तालुक्यातील श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे पाऊस झालेल्या भागातील ५२ शेतकऱ्यांना रब्बीसाठी गहू, ज्वारी, हरभऱ्याच्या बियाण्याचे वाटप करण्यात आले. संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळाची गडद छाया असल्याच्या पार्श्वभूमीवर हे वाटप करण्यात आले. स्वामीजींच्या उपस्थितीत विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे आदींच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.गंगापूर येथील लासूर - गंगापूर महामार्गावरील प्रांगणात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा प्रवचन व दर्शन सोहळा झाला. त्यावेळी संस्थानच्या सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून हे बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत बंब, माजी आमदार अण्णासाहेब माने, प्रभारी नगराध्यक्ष फैसल चाऊस, जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष माने, राजेश्वर मुंदडा, नगरसेवक संदेश गंगवाल, किशोर धनायत, बाजार समिती सभापती नंदकुमार गांधीले आदी उपस्थित होते. यावेळी सभापती हरिभाऊ बागडे म्हणाले, समाजाला उपदेश करुन बिघडलेल्या माणसांना घडवण्याचे काम स्वामीजी करत आहेत. पावसाचे पाणी वाचले तरच भविष्यात शेतकरी जगू शकतो. शिवसेना उपनेते व खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. येथील जनतेला दिलासा व आपल्या आशीर्वादाची गरज आहे. स्वामीजींनी १ लाख ४४ हजार जणांना विधीवत पुन्हा हिंदू धर्मात आणले आहे. त्यांचे हे कार्य मोठे आहे.
या सोहळ्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे अमृतमय प्रवचन झाले. हिंदू समाज जाती, पंथ व राजकीय गटागटांत विखुरल्याने त्याची वाताहत झाली आहे. हिंंदू धर्म वाचवण्यासाठी राजाश्रयाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. लालसेपोटी भरकटलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वप्रथम गुरूचे ऐकले पाहिजे. हिंदू धर्मप्रचार, प्रसार व संस्कृती टिकवण्यासाठी स्वतंत्र शाळा, महाविद्यालये सुरू केली पाहिजेत, असे सांगितले. (प्रतिनिधी)


पाऊस झालेल्या भागातील शेतकऱ्यांना मदत.
सामाजिक उपक्रमांतर्गत संस्थानतर्फे वाटप.
विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती.
हिंदू धर्म वाचविण्यासाठी राजाश्रयाची गरज.

Web Title: Distribution of seeds by Narendrabaryaji Maharaj Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.