जिल्ह्यात मतदारयादी दुरूस्ती मोहीम

By admin | Published: May 15, 2015 10:24 PM2015-05-15T22:24:16+5:302015-05-15T23:34:00+5:30

आॅनलाईन सुविधा : तीन दिवस विशेष मोहीम राबवण्यावर भर देणार

District Electoral Rolls Campaign | जिल्ह्यात मतदारयादी दुरूस्ती मोहीम

जिल्ह्यात मतदारयादी दुरूस्ती मोहीम

Next

रत्नागिरी : मतदार याद्यांमधील दोष दूर करण्यासाठी तसेच मतदार यादीमध्ये नवीन नावनोंदणी करता यावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने ३ मार्च २०१५ पासून राष्ट्रीय मतदार याद्या शुध्दीकरण व प्रमाणिकरण कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र व तहसील कार्यालयात असलेल्या मतदार मदत केंद्राच्या ठिकाणी १७ मे, २१ जून व १२ जुलै या दिवशी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे.
मतदार याद्या शुध्दीकरण व प्रमाणिकरण कार्यक्रमांतर्गत मतदारांनी त्यांचे स्थानिक रहिवास असलेल्या ठिकाणच्या मतदार यादीमध्ये असलेले नाव सोडून इतर मतदान केंद्राच्या मतदार यादीत नाव असल्यास ते स्वत:हून वगळण्यासाठी नमुना क्र. ७मध्ये अर्ज करावा. मतदार यादीतील तपशिलाबाबत दुरुस्तीसाठी नमुना क्र.८, ८ अ भरून द्यावेत. मतदारांचा मतदार ओळखपत्र डाटा युआयडीच्या आधारकार्ड डाटाशी जोडण्यात येणार असल्याने मतदारांनी आपला आधारकार्ड क्रमांक, मतदार ओळखपत्र क्रमांक, मोबाईल क्रमांक व ई-मेल पत्ता (असल्यास) आपल्या मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे घरभेटीच्या वेळी अथवा विशेष मोहिमेच्या दिवशी मतदान केंद्रामध्ये द्यावेत अथवा विहीत नमुना ‘ए’मध्ये माहिती भरुन द्यावी.
सर्व मतदान केंदांच्या ठिकाणी रविवार, १७ रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी या दिवशी आपला व आपल्या कुटुंंबातील मतदार असलेल्या व्यक्तिंचा आधारकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक व ई-मेल पत्ता असल्यास त्याची नोंद आपल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे अथवा आपले तहसील कार्यालयातील मतदार मदत केंद्रामध्ये करावी.
स्वत:ला आपले आधार कार्ड क्रमांक व मतदार ओळखपत्र क्रमांकाची नोंदणी आॅनलाईन पध्दतीने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या ँ३३स्र२://ूीङ्म.ेंँं१ं२ँ३१ं.ङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर वस्रंि३ी ङ्म४१ अँिं१ या ठिकाणी तसेच भारत निवडणूक आयोगाच्या ीू्र.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल (एनवीएसपी) या संकेतस्थळाचा वापर करुन करता येईल.
अर्जामध्ये चुकीचे शपथपत्र देऊन एकापेक्षा जास्त ठिकाणी नावे नोंदणी केली जाणे, ही बाब लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५०चे कलम ३१ प्रमाणे गुन्हा आहे, याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी आपल्या मतदान केंद्राच्या मतदान केंद्रस्तरीय (बीअ‍ेलओ), तहसीलदार व उपविभागीय अधिकारी या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे. मतदार याद्या पुनर्नोंदणीचा कार्यक्रम सुरू होत असल्याने पुन्हा मतदार जागृती आवाहनाला सुरूवात करण्यात आली आहे. एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: District Electoral Rolls Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.