जिल्ह्यात अन्न-औषध प्रशासनाच्या ‘झोपा’?
By admin | Published: June 18, 2015 12:35 AM2015-06-18T00:35:05+5:302015-06-18T00:36:12+5:30
अनेक तक्रारी : कारवाईबाबत मात्र ढिम्मपणा
रत्नागिरी : ‘मॅगी’वर बंदी आल्यानंतर आरोग्याला हानिकारक असलेल्या चायनीज फूडवरील संभाव्य कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यात चायनीजच नव्हे; तर विक्री होणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्येही घातक रसायनांची भेसळ असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. मात्र, याबाबतीत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या ‘झोपा’ सुरू असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
गेल्या दोन वर्षांच्या काळात जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळीबाबत कोणतीही मोठी कारवाईच झाली नसल्याने शासनाचा हा विभाग जिल्ह्यात आहे की नाही, असा सवाल निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यात चायनीज व्यवसायाला बरकत आली आहे. मात्र, या चायनीज पदार्थात अजिनोमोटोसारखा घातक पदार्थ वापरला जातो. त्यामुळे चायनीज सेंटर्समधील खाद्य खाणाऱ्या लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
मॅगीनंतर चायनीजवर गाज येणार असल्याची चर्चा असतानाच जिल्ह्यात किती चायनीज सेंटर्सना परवाने दिले आहेत, याची माहिती सांगण्यासाठी शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाकडे सक्षम अधिकारीच नाहीत.
साळवी स्टॉप येथील जीवन प्राधिकरणच्या इमारतीत अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय आहे. त्याठिकाणी माहिती घेण्यास गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यानी आपणास असे किती परवाने जिल्ह्यात दिले गेले आहेत, याची माहिती नसल्याचे सांगितले.
रत्नागिरीच्या या कार्यालयात परवाना अधिकारीच नसल्याने या रिक्त पदाचा भार ठाणे कार्यालयाचे परवाना अधिकारी चौधरी यांच्याकडे देण्यात आल्याचे या कार्यालयातून सांगण्यात आले. हे प्रभारी अधिकारी पंधरा दिवसानी येतात, अशी माहितीही देण्यात आली. त्यामुळेच जिल्ह्यातील खाद्यपदार्थांतील भेसळीबाबत शासनाचा हा विभाग किती गंभीर आहे, हेच स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात शहरांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने चायनीज खाद्यपदार्थ विक्रीची सेंटर्स आहेत. त्याशिवाय गावा-गावांतही चायनीज सेंटर्स सुरू झाली असून, या सेंटर्सची संख्या हजारच्यावर आहे. मात्र, त्यांची नोंदणीच अत्यल्प झाली आहे. असंख्य सेंटर्स ही कोणाच्या तरी आशीर्वादाने महिन्याची देणगी देत चालू आहेत. काही जणांना फेरीवाल्याचे परवाने देण्यात आले आहेत. सायंकाळच्यावेळी सुरू होणारी ही सेंटर्स रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत खुली असतात. तेथे चायनीज पदार्थांचा आस्वाद घेण्यास अनेकजण येतात. हे पदार्थ अत्यंत लोकप्रियही आहेत. मात्र, ते खाणे आरोग्याला किती घातक आहे, याची कोणतीही कल्पना सामान्य माणसांना नाही. असे असताना भेसळ करणाऱ्यांवर अन्न औषध प्रशासन उदार आहे काय, असा सवालही केला जात आहे. (प्रतिनिधी)