बुलडाणा येथे करणार जिल्ह्याचे नेतृत्व
By admin | Published: October 5, 2015 10:04 PM2015-10-05T22:04:15+5:302015-10-06T00:30:20+5:30
निकाल जाहीर : जिल्हास्तरीय स्पोर्ट्स डान्स स्पर्धा
चिपळूण : जिल्हा व शहर स्पोर्ट्स डान्स असोसिएशनतर्फे दुसरी जिल्हास्तरीय ज्युनिअर व सिनिअर स्पोर्ट्स डान्स स्पर्धा ब्राह्मण सहाय्यक संघ, चिपळूण येथे घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेतून निवड झालेला संघ बुलडाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय डान्स स्पर्धेत जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.
१६ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये श्रध्दा चव्हाण, १८ वर्षांखालील मुलींमध्ये भाग्यश्री राठोड यांनी सुवर्ण, अक्षता जावळेने रौप्य, वैष्णवी आंब्रेने कांस्य, तर २० वर्षांखालील मुलांमध्ये सूरज गायकवाड याने सुवर्णपदक मिळवले आहे. शास्त्रीय नृत्य प्रकारातील सोलोमध्ये १६ वर्षांखालील मुलींमध्ये सिध्दी ओक, १८ वर्षांखालील मुलींमध्ये हिमानी सन्नाक, २० वर्षांवरील मुलींमध्ये आर्या चितळे यांनी सुवर्णपदक मिळवले आहे.
शास्त्रीय ड्युएट प्रकारात १६ वर्षांखालील मुलींमध्ये अर्पिता वारणकर, मृणयी रेडीज, पाश्चात्य नृत्यात १६ वर्षांखालील मुलींमध्ये गौरी हरदारे हिने सुवर्ण, सिध्दी ओकने रौप्य, ड्युएटमध्ये साक्षी शिंदे व अश्विनी सुर्वे यांनी सुवर्ण, १८ वर्षांखालील मुलांमध्ये प्रथमेश पिंपळकर याने सुवर्ण, सुमेध अनुसकर याने रौप्य, तेजस शिंदे याने कांस्य, मुलींमध्ये शीतल मोहिते हिने सुवर्ण, सायली सागवेकर हिने रौप्य व ऐश्वर्या हरवंदे हिने कांस्यपदक मिळवले आहे.
२० वर्षांखालील मुलांमध्ये कृष्णा मोहिते याने सुवर्ण, पाश्चात्य मिक्स गु्रपमध्ये एमएसएमईएस हायस्कूल, अडिवरेच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. नगरसेविका आदिती देशपांडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा सिकई असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश माटे, नगरसेवक अविनाश केळस्कर, मधुसुदन केतकर, विनायक ओक, प्रा. एस. काटदरे, प्रा. संजीव मोरे, अविनाश हरदारे आदींची उपस्थिती होती. पंच म्हणून अभिजीत मोरे, स्कंधा चितळे, सूरज जाधव, चेतन घाणेकर, मंदार साळवी, विनोद राऊत, प्रणित सावंत, चेतन सोलकर, सांभवी मयेकर, नीशा गमरे, सुनील अरमरे यांनी काम पाहिले. (वार्ताहर)
जिल्हा व शहर स्पोर्ट्स डान्स असोसिएशनतर्फे आयोजन.
मुलींमध्ये श्रद्धा चव्हाण, भाग्यश्री राठोड यांना सुवर्णपदक.
मुलांमध्ये सूरज गायकवाडला सुवर्णपदक.
शास्त्रीय नृत्य स्पर्धेत सिद्धी ओक, हिमानी सन्नाक, आर्या चितळे यांना सुवर्णपदक.