जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन १७ एप्रिल रोजी
By admin | Published: April 15, 2017 01:50 PM2017-04-15T13:50:59+5:302017-04-15T13:50:59+5:30
समस्याग्रस्त व पीडीत महिलांसाठी आवाहन
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन १७ एप्रिल रोजी
सिंधुदुर्गनगरी, दि.१५ : सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १७ एप्रिल २0१७ रोजी सकाळी ११.00 ते दुपारी १.00 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिन राबविण्यात येणार आहे.
समस्याग्रस्त व पीडीत महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा स्तरावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, दालन क्र. १0६, ए ब्लॉक, तळमजला, ओरोस, जि. सिंधुदुर्ग येथून प्राप्त करून घ्यावेत. खालील विषयावरील अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर समस्याग्रस्त व पीडीत महिलांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.