जिल्हाधिकाऱ्यांनी अपील फेटाळले

By admin | Published: December 26, 2016 10:00 PM2016-12-26T22:00:41+5:302016-12-26T22:00:41+5:30

चौकुळ येथील जमीन प्रकरण : नऊजणांनी ग्रामस्थांविरोधात दाखल केले होते अपील

The District Magistrate rejected the appeal | जिल्हाधिकाऱ्यांनी अपील फेटाळले

जिल्हाधिकाऱ्यांनी अपील फेटाळले

Next

आंबोली : चौकुळ येथील १०५ एकर जमिनीसंदर्भात जगजीवन आत्माराम राऊळ यांच्यासह नऊजणांनी चौकुळ ग्रामस्थांविरोधात दाखल केलेले अपील जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावले. सावंतवाडी उपविभागीय अधिकारी (महसूल) यांनी अपिलावर दिलेला निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी कायम केल्याने गाव नेनेच्या १०५ एकर जमिनीत जगजीवन राऊळ यांच्यासह नऊजणांचा कोणत्याही प्रकारचा हक्कसंबंध नसल्याचे सिद्ध झाल्याचे अ‍ॅड. राजाराम गावडे यांनी स्पष्ट केले.
अ‍ॅड. गावडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मूळ चौकुळ कबुलायतदार गावकर यांच्या मालकीची चौकु ळ स. नं. ३४१-१ (नेने स.नं. ७४-०) क्षेत्र सुमारे १०५ एकर जमिनीचे आपण बक्षीसपत्राने मालक आहोत, अशी चुकीची वर्दी सन १९३१ मध्ये आत्माराम बाबूराव राऊळ यांनी चौकुळ तलाठ्यांना दिली. महसूल यंत्रणेला हाताशी धरून ही १०५ एकर जमीनच आपल्या नावे करून घेतली.
त्यानंतर सोमा धोंडू गावडे यांच्यासह चौकुळच्या ८८ ग्रामस्थांनी या काल्पनिक बक्षीसपत्राविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे १९९९ मध्ये केलेल्या अर्जानुसार सावंतवाडी तहसीलदारांनी पुनर्विलोकन अर्ज क्र. ८४-९८ ही केस चालविली.
या केसचा २२ जानेवारी २००० रोजी निर्णय देताना या मिळकतीत आत्माराम बाबूराव राऊळ यांचा अगर त्यांच्या वारसाचा कोणत्याही प्रकारचा मालकी हक्कसंबंध नसल्याने कागदोपत्री असलेली त्यांची नावे
कमी करून ही जमीन पुन्हा कबुलायतदार गावकर चौकुळ यांच्या नावे झाली.
त्यातच रमाकांत राऊळ यांच्यासह नऊजणांनी या आदेशाविरुद्ध उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांच्याकडे दाखल केलेले आर. टी. एस. अपील २००० सन २००४ मध्ये नामंजूर करून चौकुळ कबुलायतदार गावकरांचा मालकी हक्क मान्य करण्यात आला. त्यानंतर या आदेशाविरुद्ध जगजीवन आत्माराम राऊळ यांच्यासह नऊजणांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात दुसरे आर. टी. एस. अपील २०१४ मध्ये केले होते.
जिल्हाधिकाऱ्यांकडील अपिलात कबुलायतदार गावकर कृती समिती पदाधिकारी अ‍ॅड. राजाराम गावडे व इतर, तसेच प्रदीप भिकाजी
गावडे यांचा युक्तिवाद ग्राह्य
धरण्यात आला, असेही पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)


यापूर्वीचा निर्णय कायम
जिल्हाधिकाऱ्यांनी अपील फेटाळून लावत उपविभागीय अधिकारी सावंतवाडी व तहसीलदार सावंतवाडी यांचा यापूर्वीचा निर्णय कायम केला. त्यामुळे जगजीवन आत्माराम राऊळ यांच्यासह नऊजणांनी ही १०५ एकर जमीन काल्पनिक बक्षीसपत्राआधारे बळकावल्याचे निर्विवाद सिद्ध झाले. यापूर्वीही रमाकांत आत्माराम राऊळ व इतरांनी या मिळकतीला आपली नावे असल्याचा गैरफायदा घेऊन ही मिळकत लाखो रुपयांना विक्रीस काढली होती.

Web Title: The District Magistrate rejected the appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.