जि. प., पं. स.’साठी आघाडी करणार

By admin | Published: October 17, 2016 12:09 AM2016-10-17T00:09:55+5:302016-10-17T00:09:55+5:30

तानाजी कांबळे : जिल्ह्याची समन्वय समिती स्थापन

District P., Pt. To lead the party | जि. प., पं. स.’साठी आघाडी करणार

जि. प., पं. स.’साठी आघाडी करणार

Next

कणकवली : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, भाजपपैकी कोणत्या तरी पक्षाशी आघाडी करण्याची आरपीआयची भूमिका असल्याची माहिती आरपीआयचे सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक तानाजी कांबळे यांनी येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
फुले, शाहू, आंबेडकर यांना मानणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी एकत्र येऊन समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती जिल्ह्यातील इतर पक्षांच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करून आघाडीबाबत निर्णय घेणार आहे. या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष नाना डामरे यांची एकमताने निवड केली.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी येथील विश्रामगृहावर आरपीआय, भारिप बहुजन महासंघ व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
समन्वय समितीच्या सरचिटणीसपदी जनीकुमार कांबळे, मिलिंद कांबळे, चंद्रकांत पवार, उपाध्यक्षपदी सुरेश साळीस्तेकर, संजय तांबे, रुपेश बावडेकर, प्रकाश खरात, ए. डी. साळुंखे, सहसचिवपदी उत्तम जाधव, बाजीराव जाधव, भारिप बहुजनचे नेते सतीशकुमार साळुंखे, रि.प.चे जिल्हाध्यक्ष आनंद तांबे, प्रकाश कडुळकर हे सामाजिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
बसपा, चर्मकार, धनगर, तेली, तांबोळी, आदी समाजाला संघटित करून समन्वय समितीमध्ये सामील करून घेण्यात येणार आहे. या सर्व समाजाची एकजूट करण्यात येणार आहे. (वार्ताहर)
मराठा मोर्चाला पाठिंबा
४२३ आॅक्टोबरला निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला आरपीआय, बहुजन समाज पार्टी, समन्वय समिती यांचा पाठिंबा असल्याची माहिती तानाजी कांबळे यांनी दिली. कोपर्डी प्रकरणाचा आरपीआयच्यावतीने त्यांनी निषेध केला. ज्यांनी मुलीवर अत्याचार केला त्या आरोपींना फाशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
४अ‍ॅट्रॉसिटी रद्द करण्याला व दुरुस्तीला आरपीआयचा विरोध असल्याचे त्यांनी नमूद केले. आरपीआय, बसपा या मोर्चात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title: District P., Pt. To lead the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.