'गोकुळ'चे कोकणात विभागीय कार्यालय सुरू, दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 12:04 PM2023-06-24T12:04:27+5:302023-06-24T12:05:17+5:30

मनिष दळवी यांचा पाठपुरावा, जिल्हा बँकेच्या सहाय्याने कार्यालय सुरु

Divisional office of Gokul opened in Konkan, meeting the demand of milk producing farmers | 'गोकुळ'चे कोकणात विभागीय कार्यालय सुरू, दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी पूर्ण

'गोकुळ'चे कोकणात विभागीय कार्यालय सुरू, दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी पूर्ण

googlenewsNext

ओरोस : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड (गोकुळ) कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन आज जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते फित कापुन शुक्रवारी जिल्हा बँक प्रधान कार्यालय समोरील ओरोस प्रधिकरण क्षेत्र येथील जागेत येथे पार पडले. या कार्यालय आरोस येथे व्हावे अशी मागणी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतक-यांची होती. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केलेल्या पाठपुरव्या नंतर गोकुळने अखेर विभागीय कार्यालय सुरू केले आहे.                                                                                                                   
या उद्घाटन प्रसंगी गोकुळचे डॉ. नितीन रेडकर  पशुवैद्यकीय अधिकारी, अनिल शिखरे दूध संकलन अधिकारी, शिरीष खोपडे मार्केटिंग प्रमुख कोकण विभाग,संजय पाटील मिल्कोटेस्टर विभाग प्रमुख, भगवंत गावडे विस्तार सुपर व्हायझर,प्रसाद कोरगावकर, प्रशांत म्हापणकर तसेच जिल्हा बँक अधिकारी भाग्येश बागायत कर, मंदार चव्हाण आदी मान्यवर या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित होते.
                                  
हे कार्यालय जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्था यांच्यासाठी संपर्क कार्यालय म्हणून राहणार आहे. या कार्यालयातून सध्याच्या पशुसंवर्धन सेवा संकलन विभागाचे कामकाज चालेल. पशुसंवर्धन विभागाअंतर्गत पशुवैद्यकीय सेवा, जंत निर्मूलन औषध वाटप, वैरण बियाणे वाटप, कृत्रिम रेतन पूरक साहित्य पुरवठा तसेच कागदोपत्री व्यवहार केले जातील. संकलन विभागा अंतर्गत संस्थांच्या संकलन विषयक कामकाज, तक्रारी निवारण, उत्पादकांना मार्गदर्शन दुध संस्था प्रतिनिधींना सर्व प्रकारची प्रशिक्षण, मासिक मीटिंग यासारखे कामकाज या कार्यालयातून केले जाणार आहे.

सिंधूदुर्ग जिल्हा बँक, गोकुळ, भगिरथ प्रतिष्ठान,  जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दुध वाढ कार्यक्रम सुरू असल्याने सर्व दृष्टीने संपर्क साधण्यासाठी जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा बँकेच्या सहाय्याने हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

Web Title: Divisional office of Gokul opened in Konkan, meeting the demand of milk producing farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.