ज्ञानेश्वर सोडल यांना कायमस्वरुपी नेमा

By admin | Published: February 3, 2015 10:36 PM2015-02-03T22:36:48+5:302015-02-03T23:54:16+5:30

तोडणकर, आचरेकर यांची मागणी

Dnyaneshwar Sodal is permanent | ज्ञानेश्वर सोडल यांना कायमस्वरुपी नेमा

ज्ञानेश्वर सोडल यांना कायमस्वरुपी नेमा

Next

मालवण : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी डॉ. ज्ञानेश्वर सोडल व भूलतज्ज्ञ डॉ. पराग नायगावकर यांना दोषी ठरविणे योग्य नाही. डॉ. सोडल व नायगावकर यांच्या पाठीशी मालवण नगरपालिका खंबीरपणे उभी असल्याचे नगराध्यक्ष अशोक तोडणकर व माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी सांगत डॉ. सोडल यांची एनआरएचएमअंतर्गत मालवण ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी नियुक्ती करावी, अशी मागणी सोमवारी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.कसाल येथील जयश्री शिंगाडे यांचा गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ. सोडल आणि डॉ. नायगावकर यांच्यावर हलगर्जीपणाचा आरोप झाला. यावेळी बोलताना तोडणकर-आचरेकर द्वयी म्हणाले की, या प्रकारास डॉक्टरांना दोषी ठरविणे चुकीचे आहे. डॉक्टर म्हणजे देव नाही. डॉक्टर रुग्णासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. विविध तपासण्या व उपचार करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात आधुनिक वैद्यकीय उपकरणे व सोयीसुविधा असणे गरजेचे आहे. मात्र, अशा सोयीसुविधा पुरविण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या घटनेस शासन जबाबदार आहे. काही वेळा एखादा रुग्ण आकस्मिकरीत्या बळी ठरू शकतो. डॉ. सोडल यांनी आजपर्यंत चांगली सेवा बजावली असून, हजारो शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केल्या आहेत. (प्रतिनिधी)

सरकारचे दुर्लक्ष :
सुदेश आचरेकर
सध्याचे भाजप-शिवसेनेचे सरकार रुग्णालयांमधील असुविधांबाबत गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येते. रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविण्याकडे हे सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप सुदेश आचरेकर यांनी यावेळी केला.
तसेच नुकतेच सिंधुुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करून गेलेले आरोग्य राज्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील रुग्णालयांना भेट दिली नाही. सिव्हील हॉस्पिटलची पाहणी केली नाही. यातच सर्वकाही दिसून येते, असेही आचरेकर म्हणाले.

Web Title: Dnyaneshwar Sodal is permanent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.