संसाररुपी रथाची परिक्रमा सुखकर होण्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथ सहाय्यभूत : देवव्रत वासकर महाराज
By admin | Published: April 25, 2017 06:03 PM2017-04-25T18:03:36+5:302017-04-25T18:03:36+5:30
शिरवल येथे आयोजित ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण शुभारंभ
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. २५ : सुख-दु:खाच चक्र अव्याहतपणे सुरुच असत. सुख वृध्दींगत होण्यासाठी आणि दु:खाचा भार हलका होण्यासाठी ज्ञानेश्वरीचे पारायण जीवनात उपयुक्त आहे. संसाररुपी रथाच्या परिक्रमा सुखकर होण्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथराजाच पारायण निश्चित सहय्यभूत ठरते असा विश्वास गुरुवर्य ह. भ. प. देवव्रत वासकर महाराज यांनी शिरवल ता. कणकवली येथे आयोजित ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण शुभारंभ प्रसंगी केले.
श्री विठ्ठल - रखुमाई मंदिर शिरवल येथे विठ्ठल रखुमाई ट्रस्टच्या वतीने आयोजित सामुदायिक श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण व मंदिराचा दुसरा वर्धापन सोहळ्याचे शुभप्रसंगी वासकर महाराज प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, ह. भ. प. काशिनाथ महाराज फोकमारे (शेगाव) निमंत्रक ह. भ. प. विश्वनाथ गवंडळकर, प्रभाकर करंबळेकर, पांडुरंग सावंत, रुपेश सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी श्री विठ्ठल-रखुमाई मूर्तीस अभिषेक, कलश पूजन व भजनाच्या पंचपदीने कार्यक्रमास सुरुवात झाली. २ मे २0१७ रोजी पर्यंत या निमित्त मंदिरात सकाळी ५.३0 वाजता काकड आरती, ८ ते १२ व दुपारी ३ ते५ ग्रंथवाचन, रात्रौ ८ ते १0 किर्तन असे कार्यक्रम होणार आहेत. यावेळी आर. के. जोशी, मिलिंद बांदिवडेकर यांचेही समयोचित भाषणे यावेळी झाली.