जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करू

By admin | Published: April 8, 2017 09:38 PM2017-04-08T21:38:13+5:302017-04-08T21:38:13+5:30

नूतन सभापतींची ग्वाही : जिल्हा परिषदेच्या सभापतींची निवड; नव्या चेहऱ्यांना संधी

Do the efforts for the development of the district | जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करू

जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करू

Next

सिंधुदुर्गनगरी : सर्वांच्या सहकार्यातूून जिल्हा परिषद सदस्य म्हणून पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघातून मी निवडून आलो. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, काँग्रेसच्या सर्वच सदस्यांनी माझ्यावर सभापतिपदाची टाकलेली जबाबदारी स्वीकारून जिल्ह्याच्या विकासासाठी काम करेन. जनतेच्या समस्या सोडवून सभापतिपदाचा पारदर्शक कारभार करणार असल्याचे मत वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, वराड पंचायत समिती मतदारसंघातून पंचायत समिती सदस्य व त्यानंतर मालवण उपसभापतिपदावर मी यापूर्वी काम केले आहे. २०१० पासून राजकारणातून काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. आजही तसेच कार्य सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्ष मजबूत करण्यासाठी सभापतिपदाच्या माध्यमातून जिल्ह्याला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत राहीन. सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचेही यावेळी संतोष साटविलकर यांनी सांगितले.
यावेळी शारदा कांबळे म्हणाल्या, माझ्यावर जो विश्वास टाकला आहे. त्या समाजकल्याण सभापतिपदाचा उपयोग मी ग्रामीण भागातील दुर्लक्षित, मागासवर्गीय जनतेच्या विकासासाठी करणार आहे. तसेच जिल्ह्यात अनेक गावात अद्याप दुर्लक्षित विकास योजनांपासून वंचित मागासवर्गीय आहेत. समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अधिक भर देणार असल्याचे नूतन समाजकल्याण सभापती शारदा कांबळे यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या, आपण कोळप मतदारसंघातून निवडून आलो आहोत. राजकारणात पहिलीच वेळ जरी असली तरी समाजकारणाची आवड आहे. माझे पती शरद कांबळे हे राजकारणात असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्यातूनच व नव्या उमेदीने आपण समाजासाठी व अनेक उपक्रमातून मागासवर्गीय कुटुंबाना न्याय देण्याचा प्रयत्न करीत जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती म्हणून झालेली निवड सार्थ ठरवित, त्या पदाचा योग्य तो उपयोग समाजकल्याणासाठी करेन, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. नारायण राणे व कुटुंबीयांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याचे सार्थक करून जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न कण्याची ग्वाही यावेळी शारदा कांबळे यांनी दिली.
महिला व बालकल्याण सायली सावंत म्हणाल्या, राजकारणाचा माजी काँग्रेस अध्यक्ष रमाकांत सावंत यांचा वारसा आहे.
माझ्यावर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदाची जबाबदारी असून बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, कुपोषण मुक्तीचे काम, आरोग्यविषयी माहिती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे, महिला शेतकरी यांना माहिती देणे तसेच अनेक योजनांची माहिती तळागाळार्पंत पोहोचविण्याचे काम करणार असल्याचे नूतन महिला व बालकल्याण सभापती सायली सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


शैक्षणिक गुणवत्ता वाढविणार : राऊळ
रेडी जिल्हा परिषद मतदारसंघात आरोग्यविषयक उपक्रमांबरोबरच रेडी जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व प्राथमिक शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण रेडी ग्रामपंचायत उपसरपंच पदापासून ते काँग्रेस युवक तालुकाअध्यक्ष तसेच सरचिटणीस पदापर्यंत कार्याची सुरूवात केली आहे. शिक्षण व आरोग्य ही दोन्ही खाती महत्त्वाची असून त्या खात्यांच्या योजनांचा मी जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उपयोग केला आहे.
अनेक समस्या व उपाययोजना राबविल्या आहेत. माकडताप, स्वाईन फ्ल्यू व इतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रयत्न करणार असून रेडी गावच्या सर्वच शाळा डिजिटल करून जिल्ह्यात नंबर एक राहण्याचा मान मिळविणार आहे. मार्गदर्शन विषयक करिअर गाईड्स तसेच इतर शिबिरे युवा वर्गासाठी राबविणार आहे. इंग्रजी सर्व ठिकाणी सुरू असून आता ही काळाची गरज असल्याने प्राथमिक शाळांना लक्ष केंद्रीत करून उपक्रम राबविणार आहे, असे मत शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी व्यक्त केले.

Web Title: Do the efforts for the development of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.