बॅक डेटने कामांना मंजुरी देऊ नका : के. मंजुलक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:01 PM2019-03-13T13:01:33+5:302019-03-13T13:04:38+5:30

१७ व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचार संहिता १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरु झाली आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही कामाला बॅक डेटने मंजुरी देऊ नका, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी आपल्या खातेप्रमुखांना दिल्याचे समजते.

Do not approve works by back date: K Manzilakshmi | बॅक डेटने कामांना मंजुरी देऊ नका : के. मंजुलक्ष्मी

बॅक डेटने कामांना मंजुरी देऊ नका : के. मंजुलक्ष्मी

Next
ठळक मुद्देबॅक डेटने कामांना मंजुरी देऊ नका : के. मंजुलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रशासनाला आदेश

सिंधुदुर्गनगरी : १७ व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचार संहिता १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरु झाली आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही कामाला बॅक डेटने  मंजुरी देऊ नका, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी आपल्या खातेप्रमुखांना दिल्याचे समजते.

केव्हाही आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचे लक्षात आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुलक्ष्मी यांनी शनिवार व रविवार शासकीय सुट्टी असताना कार्यालयात हजर राहून आवश्यक कामे पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार या दोन्ही दिवशी जिल्हा परिषदेतील कार्यलये सुरु होती. रविवारी संध्याकाळी ५ वाजता निवडणूक आयुक्तांनी १७ व्या लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा केल्याने संपूर्ण देशात आचार संहिता लागू झाली आहे.

परिणामी आता कोणत्याही नवीन कामांना मंजुरी देणे, ई-निविदा प्रसिद्ध करणे, कार्यारंभ आदेश देणे ही प्रशासकीय पातळीवरील कामे थांबणार आहेत. तसे केल्यास निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका येऊ शकतो. त्यामुळे सोमवारी मंजूलक्ष्मी यांनी कोणत्याही कामांची बॅक डेटने पूर्तता करावयाची नाही, असे आदेशच आपल्या प्रशासनाला बजावले आहेत.

मोठ्या प्रमाणावर निधी अखर्चीत राहणार

दरम्यान, १० मार्च रोजी सुरु झालेली आचारसंहिता २७ मे पर्यंत सुरु राहणार आहे. २३ एप्रिल रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी निवडणूक होत असली तरी निवडणूक आयुक्तांनी २७ मे पर्यंत आचारसंहिता लागू राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यावर्षी जिल्हा परिषदेचा खर्च १०० टक्के होणार नाही. जिल्हा नियोजनने जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांची यादी नुकतीच दिली आहे. त्याचेही सोपस्कार पूर्ण करावयाचे राहिलेले आहेत. जिल्हा परिषदेचा स्वनिधी खर्च फेब्रुवारी अखेरपर्यंत ४० टक्केच झाला होता. त्यामुळे हा निधीही मोठ्या प्रमाणात अखर्चित राहण्याची शक्यता आहे.

ग्रामीण विकासाला खीळ बसणार

२७ मे पर्यंत आचार संहिता राहणार आहे. तर याच दरम्यान जिल्ह्यात पाऊस सुरु होतो. त्यामुळे रस्ते, शाळा दुरुस्ती, नवीन इमारती हि कामे निश्चितच रखडणार आहेत. लोकसभेची आचारसंहिता असल्याने निधी खर्चाचे नियोजन वेळेत करा, अशी मागणी पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य वारंवार करीत होते. तरीही निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित राहणार असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला खीळ बसणार आहे.

Web Title: Do not approve works by back date: K Manzilakshmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.