समुद्रातूून येणाऱ्या आवाजाने घाबरून जाऊ नये : केसरकर
By admin | Published: April 27, 2016 11:11 PM2016-04-27T23:11:47+5:302016-04-27T23:20:06+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी मंत्रालयातून केले आहे.
सिंधुदुर्गनगरी : गेल्या काही दिवसांपासून सिंधुुदुर्ग येथील समुद्रातून स्फोटाचे आवाज येत आहेत. हा भूकंप वा त्सुनामी नसून, असे आवाज येण्यामागील कारणांचा तज्ज्ञांच्या माध्यमातून शोध घेण्यात येईल. आवाजाची तीव्रता जास्त असल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अफवांवर विश्वास ठेऊ नये व याबाबत कुठलीही अफवा पसरवू नये, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी मंत्रालयातून केले आहे. समुद्रातून येणाऱ्या गूढ आवाजाबाबत केसरकर यांच्या मंत्रालयीन दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. सिंधुुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे, महाराष्ट्र कोस्टल गार्डचे (आॅपरेशन अँड प्लॅनिंग) अनिल शर्मा, मत्स्य व्यवसाय प्रादेशिक उपायुक्त डॉ. सुनील देशपांडे, सिंधुदुर्ग भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भू-वैज्ञानिक रश्मी कदम, आदी यावेळी उपस्थित होते.
केसरकर पुढे म्हणाले, भूूकंप होणार, त्सुनामी येणार ही केवळ अफवा आहे. याबाबत भूरचना शास्त्र विभागाचे संचालक यांचा ‘इन्क्वॉयस हैदराबाद’ या संस्थेच्या वरिष्ठांशी संवाद झाला आहे. कोकणात लॅटराईट खडक असल्यामुळे भूकंप होण्याची शक्यता नाही, असे इन्क्वॉयसचे म्हणणे आहे. डायनामाईट फिशिंगमुळे असे आवाज येत असतील तर त्याला प्रतिबंध करण्याच्या सूचना कोस्टल विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. स्थानिक मासेमाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मान्सून दाखल होत असताना मान्सूनचे संकेत म्हणून असे आवाज येत असतात. याबाबतही भारतीय हवामान खात्याने ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले आहे. आपत्ती व्यवस्थापनाबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्तम व्यवस्था करण्यात आली असून, भूकंपाचे मोजमाप करणाऱ्या यंत्रणांनी काळजी घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
ब्लू टीम पडणार रेड टीमवर भारी
सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी स्थानिक पोलिसांची ब्ल्यू टीम सुरक्षा कवच मोहिमेत कार्यरत असते, तर राज्यातील अन्य भागातून रेड टीमला सुरक्षा कवच भेदण्यासाठी पाठविण्यात येते. आतापर्यंत मात्र ब्ल्यू टीमचे रेड टीम सुरक्षा कवच भेदू शकलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या ब्ल्यू टीमच्यावतीने सागरी मार्ग तसेच मुख्य रस्ता मार्गावरही वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. रेड टीमला पकडण्यास ब्लू टीम यशस्वी ठरली, तर ब्ल्यू टीम अभिनंदनास पात्र ठरते. मात्र, रेड टीम ब्ल्यू टीमची सुरक्षा भेदण्यात यशस्वी ठरली, तर ब्ल्यू टीमला कारवाईस तयार राहावे लागते. त्यामुळे रेड टीमचे आव्हान भेदण्यासाठी पोलिसांची ब्ल्यू टीम सतर्क बनली आहे.