अन्याय रोखण्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र या

By admin | Published: May 28, 2015 12:21 AM2015-05-28T00:21:22+5:302015-05-28T00:57:52+5:30

नीतेश राणे : खारेपाटण, तळेरे, साळीस्ते येथे चौपदरीकरणाबाबत ग्रामस्थांशी संवाद

Do not forget about the differences in the conflict | अन्याय रोखण्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र या

अन्याय रोखण्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र या

Next

कणकवली : महामार्ग चौपदरीकरणाचे सर्वेक्षण कोणतीही ठोस माहिती न देता केले जात आहे. ही पद्धत थांबली पाहिजे. भूमिपुत्रांवर होणारा अन्याय थांबण्याबरोबरच त्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. भूमिपुत्रांच्या या हक्कांसाठी पक्षभेद विसरून अन्यायाविरूद्ध सर्वांनी एकत्र येऊया, असे आवाहन कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी केले.
महामार्ग चौपदरी करणाच्या पार्श्वभूमीवर आमदार नीतेश राणे यांनी तळेरे, साळीस्ते, वारगाव, नडगिवे, खारेपाटण येथील चौपदरीकरणात जमिनी जात असलेल्या ग्रामस्थांशी सोमवारी थेट संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष रमाकांत राऊत, शरद कर्ले, बाळा जठार, शरद वायंगणकर, गोट्या कोळसुलकर, बापू डंबे, शशांक तळेकर, दर्शना बांदेकर, दीपक नांदोस्कर, दिलीप तळेकर, प्रवीण वरूणकर, आनंद शंकरदास, जिल्हा परिषद सदस्या रत्नप्रभा वळंजू, एकनाथ कोकाटे, गजानन सावंत, अरुण कर्ले, राजेश वारंग, आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी महामार्गाच्या सर्वेक्षणात कशाप्रकारे अन्याय केला जात आहे, याचे सविस्तर वृत्त कथन केले.
आमदार राणे म्हणाले, सरकार आणि जिल्ह्यातील प्रशासन चौपदरीकरणाची आपली भूमिका स्पष्ट करीत नाहीत. जमिनीला भाव काय देणार हे भूमिपुत्रांना सांगत नाहीत. अंधारात ठेवून सर्व्हेचे काम सुरू करणे आणि विचारल्यास वर धमकावणे हा प्रकार म्हणजे आमच्या घरात येऊन, फुटपट्टी लावून आम्हालाच दम देण्याचा प्रकार आहे. हे थांबवायचे असेल, तर प्रथम संघटित होणे गरजेचे आहे आणि हे संघटन फक्त अन्यायग्रस्तांपुरते मर्यादित न राहता ते गावातील सर्व जनतेचे संघटन झाले पाहिजे. विकासाला विरोध करण्यासाठी नाही, तर अन्यायाविरूद्ध वाचा फोडण्यासाठी, अन्यायग्रस्तांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी संघटित व्हा, त्यात पक्षभेद नको. सरकार आणि जिल्हा प्रशासन यांची भूमिका नेहमीच संभ्रमावस्थेची आहे.
कणकवली प्रांताधिकाऱ्यांसारखी जबाबदार मंडळी जमिनीची रक्कम भरपूर देऊ, असे सांगतात. भरपूर म्हणजे किती? शहरात अडीचपट आणि ग्रामीण भागात पाचपट? ही पटवारी संख्या किती रकमेच्या वर आहे, हे पहिले सांगा. झाडे आहेत, घरे आहेत. त्यांचे मूल्यांकन काय? जमीन व घरांसह भूमिहीन होणाऱ्यांचे पुनर्वसन कोठे करणार? शहराला एक आणि ग्रामीणला एक असा दुजाभाव का करताय? या सर्व प्रश्नांची उत्तरे जोपर्यंत शासन देत नाही आणि प्रत्येक भूमिपुत्राचे शंकानिरसन होत नाही तोपर्यंत रस्त्याच्या सर्र्वेक्षणाच्या कामास आमचा विरोध राहणार असल्याचेही आमदार राणे यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)


आमच्यावरील अन्याय दूर करा
महामार्गासाठी भूसंपादन करताना आमच्यावर शासनाकडून अन्याय केला जात आहे. हा अन्याय दूर करून आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी अनेक भूमिधारकांनी आमदार नीतेश राणे यांच्याकडे केली.

Web Title: Do not forget about the differences in the conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.