डॉक्टर दाम्पत्याचा मानसिक छळ

By admin | Published: November 23, 2015 11:13 PM2015-11-23T23:13:53+5:302015-11-24T00:26:58+5:30

शिष्टमंडळ आक्रमक : जिल्हा शल्यचिकित्सकांना विचारला जाब

Doctor's mental torture of a couple | डॉक्टर दाम्पत्याचा मानसिक छळ

डॉक्टर दाम्पत्याचा मानसिक छळ

Next

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा सामान्य रूग्णालयात उत्तम सेवा देणारे डॉक्टर दाम्पत्य अचानक येथील नोकरी सोडून अन्य ठिकाणी जाण्याची मानसिकतेत का होते? आणि त्या दाम्पत्याचा मानसिक छळ करणाऱ्या रॅकेटची जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून पाठराखण का केली जाते ? याचा पोलखोल करण्यासाठी अणाव व रानबांबूळीच्या शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय वंदाळे यांची भेट घेत जाब विचारला. वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, वंदाळे यांनी थातूरमातूर उत्तरे देत ‘त्या’ प्रकरणावर जिल्हा शल्यचिकित्सकच बोलतील, असे सांगत बाजू मारून नेण्याचा प्रयत्न केला.ग्रामस्थांच्या शिष्टमंडळामध्ये बाळू पालव, सुनील बोंद्रे, सूर्यकांत बालम, भगवान परब, गजानन वायंगणकर, शेखर परब, मामा आरोसकर, रोशन परब, राकेश बोभाटे, हर्षद मयेकर यांच्यासह ३० जणांचा सहभाग होता. सहा महिन्यांपूर्वी रिक्त झालेल्या पदावर हा वैद्यकीय अधिकारी रूजू झाला होता. रूजू झाल्यापासून जिल्हा रूग्णालयासह सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये यांना भेटी देऊन आरोग्याच्या सोयी सुधारण्याचा प्रयत्न त्यांनी केला. येथील जिल्हा रूग्णालयातही त्यांनी चांगली सेवा दिली. त्यांची पत्नीही त्याच रुग्णालयात डॉक्टर या पदावर असल्याने या दाम्पत्याने उत्तम प्रकारे रूग्णांना सेवा देण्याचा वसा घेतला होता.
गेले काही दिवस या दाम्पत्याला तेथीलच काही कर्मचाऱ्यांकडून त्रास होऊ लागल्याने या त्रासातून कायमस्वरूपी मुक्तता व्हावी, यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत आपली व्यथा मांडली व आपली बदली अन्य जिल्ह्यात द्या, अशी मागणी केली आहे.
सिंधुदुर्गात तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा आहे. डॉक्टर या जिल्ह्यात येण्यास धजावत नाहीत. येथील जिल्हा रूग्णालयात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांकडून कार्यक्षम डॉक्टरांना त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची नेहमी चांगली सेवा देण्याची इच्छा असते. परंतु काही कामचुकार कर्मचाऱ्यांकडून त्यांना सहकार्य मिळत नाही.उलट आपली मनमानी चालत नाही, या द्वेषापोटी चांगल्या डॉक्टरांना टार्गेट करून त्यांना येथून बदली करून घेण्याच्या मानसिकतेपर्यंत आणण्याचे ेकाम अशा कर्मचाऱ्यांकडून होते. अशाच या रॅकेटमध्ये अडक लेल्या डॉक्टर दाम्पत्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्र ारकेली आहे. यामुळे जिल्हा रूग्णालयाची ढेपाळलेली आरोग्य सेवा आणखीन कोलमडू नये. डॉक्टरांना त्रास देणाऱ्या रॅकेटला जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून अभय का दिले जाते? याचा जाब विचारण्याची गरज आहे, असा ओरोस, रानबांबूळी व अणाव येथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय वदाळे यांना जाब विचारला. मात्र, त्यांनी समर्पक उत्तरे देण्याचे टाळत या विषयावर जिल्हा शल्यचिकित्सक बोलतील, असे सांगून वेळ मारून नेली. त्यामुळे हे प्रकरण आता चिघळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

काही कर्मचाऱ्यांचा खटाटोप : डॉक्टर्सना हाकलण्याचे प्रयत्न?
रूग्णांची सेवा करण्यासाठी सिंधुदुर्गची निवड
विशेषत: सिंधुदुर्ग जिल्हा म्हटला की, या जिल्ह्यात काम करण्यासाठी अधिकाऱ्यांची मानसिकता नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. विविध सभांमधून बोलले जाते. जिल्हा रूग्णालयात तर काय, विचारायलाच नको. अशा प्रतिकूल परिस्थितीतही जिल्हा रुग्णालयातील या वरिष्ठ अधिकाऱ्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राधान्य देत या ठिकाणी नियुक्ती करून घेतली. या डॉक्टरांचे आभार मानायचे सोडाच, तर त्याला आणखी त्रास देऊन येथून कसे पळवता येईल, यासाठी तेथील काही कर्मचारी प्रयत्नशील असल्याचे त्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

...तर तीव्र आंदोलन छेडू
यावेळी झालेल्या चर्चेत कोणत्याही डॉक्टरांची छळणूक होणार नाही, याची दक्षता घ्या. एकाच जागेवर अनेक वर्षे ठाण मांडून असणाऱ्या क र्मचाऱ्यांची बदली करा. रूग्णांना चांगली सेवा मिळेल, याला प्राधान्य द्या, जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेकडे लक्ष द्या. येथील कर्मचाऱ्यांमुळे चांगल्या डॉक्टरांना गमवण्याची वेळ येऊ नये, याची खबरदारी घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा या शिष्टमंडळाने जिल्हा रूग्णालय प्रशासनाला दिला आहे.

Web Title: Doctor's mental torture of a couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.