दोडामार्ग बांधकाम अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी घातला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 10:35 AM2019-06-22T10:35:59+5:302019-06-22T10:39:15+5:30
दोडामार्ग ते वीजघर राज्यमार्गाच्या साईडपट्टीच्या दुरावस्थेस एका मोबाईल कंपनीचा ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. संबंधित ठेकेदारास बांधकामचे अधिकारी पाठीशी घालत असल्याने सातत्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी दोडामार्ग तालुका हेल्पलाइनचे पदाधिकारी बांधकाम विभागाच्या कार्यालयात गेले असता अधिकारी अनुपस्थित असल्याने कार्यालयालाच चक्क टाळे ठोकून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
दोडामार्ग : दोडामार्ग ते वीजघर राज्यमार्गाच्या साईडपट्टीच्या दुरावस्थेस एका मोबाईल कंपनीचा ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे.
संबंधित ठेकेदारास बांधकामचे अधिकारी पाठीशी घालत असल्याने सातत्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी दोडामार्ग तालुका हेल्पलाइनचे पदाधिकारी बांधकाम विभागाच्या कार्यालयात गेले असता अधिकारी अनुपस्थित असल्याने कार्यालयालाच चक्क टाळे ठोकून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
अखेर सायंकाळी उशिरा कार्यालयात उपस्थित झालेले उपअभियंता एस.के. निकम यांना घेराव घालण्यात आला. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कार्यालयातून जाणार नसल्याचा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता.
बांधकामच्या अधिकाऱ्यांना हेल्पलाइनच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून जाब विचारला.