दोडामार्ग पोलिसांनी दारुसह पकडला १ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:03 PM2021-06-01T16:03:26+5:302021-06-01T16:06:10+5:30
liquor ban Sindhudurg : दोडामार्ग पोलिसांनी आज अवैध होणाऱ्या दारुवाहतुकी विरुद्ध मोठी कारवाई केली.सेन्ट्रो कार (एम एच ०९ ए क्यू ७०५०) हिची झाडाझडती घेतली असता गोवा बनावटीच्या विविध ब्रॅण्ड ची सुमारे ६१५६०/- रुपये किमतीची दारू सापडून आली. याविरुद्ध कारवाई करताना गाडीसह १८६५६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोडामार्ग : दोडामार्ग पोलिसांनी आज अवैध होणाऱ्या दारुवाहतुकी विरुद्ध मोठी कारवाई केली. पोलीस पेट्रोलिंग दरम्यान आधीच गोपनीय माहिती मिळाल्या प्रमाणे सेन्ट्रो कार (एम एच ०९ ए क्यू ७०५०) हिची झाडाझडती घेतली असता गोवा बनावटीच्या विविध ब्रॅण्ड ची सुमारे ६१५६०/- रुपये किमतीची दारू सापडून आली. याविरुद्ध कारवाई करताना गाडीसह १८६५६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या दारुवाहतुक प्रकरणी तुकाराम वैजू सुपल (२७) रा. तुर्केवाडी चंदगड व वैभव विठोबा चव्हाण (२७) रा. कुरकुंडी, चंदगड यांना अटक करून त्यांच्यावर र. न. ७८/२०२१ कलम महा. दारूबंदी अधि. कलम ६५ (अ) (ई).८१.८३ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.