दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 11:32 AM2021-07-29T11:32:12+5:302021-07-29T11:34:06+5:30
Tilari Dam Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 8.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2696.56 मि.मी. पाऊस झाला आहे.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 8.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2696.56 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे
दोडामार्ग - 13(2619), सावंतवाडी - 11(2894.10), वेंगुर्ला - 01 (2219.4), कुडाळ - 09(2552), मालवण - 08(2918), कणकवली - 11(2945), देवगड - 03(2386), वैभववाडी - 11(3039), असा पाऊस झाला आहे.
तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 5 हजार 204 क्युसेक्स विसर्ग सुरू
तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 5 हजार 204 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 368.8870 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.46 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा
देवघर - 60.7740, अरुणा - 78.3033, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव झ्र 2.6480, नाधवडे झ्र 3.3661, ओटाव झ्र 3.3076, देंदोनवाडी झ्र 0.2488, तरंदळे झ्र 2.2190, आडेली झ्र 1.2880, आंबोली झ्र 1.7250, चोरगेवाडी झ्र 3.2000, हातेरी झ्र 1.9630, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 1.7470, ओरोस बुद्रुक झ्र 2.4060, सनमटेंब झ्र 2.3900, तळेवाडी झ्र डिगस ङ्घ
महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे.
तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.300 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 5.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.