दोडामार्ग पाणीटंचाईमुक्त करणार

By admin | Published: April 16, 2015 10:12 PM2015-04-16T22:12:15+5:302015-04-17T00:07:46+5:30

अंकुश जाधव : २ कोटी ८७ लाखांच्या कामांना मंजुरी

Dodamarg Water Treatment Free | दोडामार्ग पाणीटंचाईमुक्त करणार

दोडामार्ग पाणीटंचाईमुक्त करणार

Next

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ मधील आराखड्यात दोडामार्ग तालुक्यासाठी २ कोटी ८७ लाखाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तसेच सभापतीपदाच्या कार्यकालापासून आतापर्यंत दोडामार्गात दहा कोटींची पाणीपुरवठाविषयक कामांना मंजुरी मिळाली असून संपूर्ण तालुका पाणीटंचाईमुक्त करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी दिली.यासाठी मला जिल्हा परिषद अध्यक्ष, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच आदींचे सहकार्य लाभल्याची माहिती अंकुश जाधव यांनी दिली. तसेच मंजुरी दिलेल्या सर्व प्रस्तावाची वेळीच पूर्तता करण्यासाठी दोडामार्ग तालुक्याचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राणे यांनी विशेष लक्ष दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ मधील आराखड्यात २ कोटी ८७ लाखाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मंजूर झालेल्या २ कोटी ८७ लाखांची कामे पुढीलप्रमाणे- मणेरी बाईतवाडी- १९ लाख २६ हजार ३००, हेवाळे घाटीवडे- १० लाख ४३ हजार १००, हेवाळे गावठणवाडी- १० लाख ४८ हजार, हेवाळे हरिजनवाडी- १२ लाख ४३ हजार, मणेरी इनामदारवाडी- १२ लाख ४२ हजार ८००, मांगेली देऊळवाडी- ११ लाख ९७ हजार १००, मोरगाव ब्रह्मपुरीवाडी- १२ लाख ३२ हजार ५००, मोरगाव हरिजनवाडी- १४ लाख ९५ हजार ७००, पिकुळे शाळेचीवाडी- १२ लाख २५ हजार ५००, तेरेखोल कुंभारवाडी- १२ लाख ४९ हजार ४००, तेरेखोल म्हावळणकरवाडी- १२ लाख ४८ हजार १००, वझरे गोडगाचीवाडी- १२ लाख ५१ हजार १००, विर्डी वरचीवाडी- १२ लाख ५९ हजार ९००, झरेबांबर गावठणवाडी- ११ लाख ३३ हजार ९०० (ही सर्व कामे सार्वजनिक विहिरीची आहेत.)
बोडण नळपाणी पुरवठा योजना- २७ लाख १९ हजार ८००, फुकेरी घारपी नळपाणी पुरवठा योजना- २२ लाख ६ हजार ४००, विर्डी हरिजनवाडी नळपाणी पुरवठा योजना २८ लाख १८ हजार २००, झरेबांबर पालवाडी, चाळ््याचे भरड नळपाणी पुरवठा योजना- ३२ लाख १५ हजार ४०० असा निधी मंजूर झाला आहे. दोडामार्ग तालुक्यात मे अखेर काही ठिकाणी पाणीटंचाईचा सामना हा ग्रामस्थांना करावा लागतो. माझ्या सभापतीपदाच्या कारकिर्दीत पाणीपुरवठाविषयक १० कोटींची कामे झाली आहेत. तरी चालू वर्षात दोडामार्ग तालुक्यातील सर्व वाडी, वस्ती, टंचाईमुक्त करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Dodamarg Water Treatment Free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.