देवगड-मिठमुंबरी समुद्र किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळला डॉल्फिन
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 17, 2022 06:51 PM2022-09-17T18:51:40+5:302022-09-17T18:52:28+5:30
किनारपट्टीवर वर्षभर असे अनेक वेळा मोठे मासे मृतावस्थेत आढळतात.
देवगड (सिंधुदुर्ग) : येथील मिठमुंबरी समुद्र किनारी तब्बल आठ फूट लांबीचा डॉल्फीन मासा मृतावस्थेत आढळला आहे. दरम्यान वनविभागाने पंचनामा करुन त्याचे दफन केले.
वनपाल सारिक फकीर व वनरक्षक निलेश साठे यांनी पंचनामा केला. यावेळी मिठमुंबरी सरपंच रिमा मुंबरकर, ग्रामसेवक रेश्मा गोवळकर, ग्रामपंचायत कर्मचारी हेमंत तोडणकर, प्रथमेश डामरी, ग्रामस्थ भालचंद्र राणे, बाबू तारी, दिलीप मुंबरकर, नरेश डामरी, लक्ष्मण तारी, सागर सुरक्षा रक्षक निलेश येरम, पोलीस कर्मचारी निलेश पाटील, कांदळवन समिती समन्वयक मृणाली डांगे, विनीता मुंबरकर तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्ह्याला १२१ किलोमीटर सागरी किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीवर वर्षभर असे अनेक वेळा मोठे मासे मृतावस्थेत आढळतात.