मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूरचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:25 AM2019-12-16T00:25:18+5:302019-12-16T00:26:16+5:30

मालवण : महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्यावतीने मालवण चिवला बीच येथे दहावी राज्यस्तरीय सागरी ...

Domination of Mumbai, Nashik, Kolhapur, Nagpur | मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूरचे वर्चस्व

मालवण येथील जलतरण स्पर्धेत वेगवान जलतरणपटूचा मान मिळविणाºया हिमानी फडके व पृथ्वीराज डांगे याना अध्यक्ष डॉ. दीपक परब यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Next

मालवण : महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्यावतीने मालवण चिवला बीच येथे दहावी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पृथ्वीराज डांगे (कोल्हापूर) व हिमानी फडके (नागपूर) यांनी वेगवान जलतरणपटूचा बहुमान मिळविला. स्पर्धेत मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर या जिल्ह्यांचे वर्चस्व राहिले. या स्पर्धेत अपंग, मतिमंद तसेच बालवयोगटातील स्पर्धकांनी चमकदार कामगिरी करीत यशाला गवसणी घातली.
सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या विद्यमाने मालवण चिवला बीच येथे आयोजित दहाव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी ७ वाजता झाले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना अध्यक्ष डॉ. दीपक परब यांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांनी समुद्रात झेंडा दाखविताच पाच किलोमीटरचे स्पर्धक समुद्रात झेपावले. माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी राज्य जलतरण संघटना सचिव राजेंद्र पालकर, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना अध्यक्ष डॉ. दीपक परब, उपाध्यक्ष बाबा परब, नील लब्दे, खजिनदार किशोर पालकर, धनंजय फडके, हृदय बागवे, डॉ. राहुल पंतवालावलकर, संदेश पारकर, हरी खोबरेकर, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, बाबी जोगी, परशुराम पाटकर, भाई कासवकर, सरोज परब, शिवाजी परब, अशोक सावंत, अशोक तोडणकर, संदेश चव्हाण, पूजा करलकर, पूजा सरकारे, ममता वराडकर, किसन मांजरेकर, आनंद मालंडकर, रुपेश प्रभू, संदेश कोयंडे उपस्थित होते.
स्पर्धेत राज्यातील २९ जिल्ह्यांतून सुमारे ११०० स्पर्धक व त्यांचे पालक सहभागी झाले. रविवारी सकाळच्या सत्रात ३ किलोमीटर, २ किलोमीटर, १ किलोमीटर व ५०० मीटर अंतरासाठी जलतरण स्पर्धा पार पडली. दुपारच्या सत्रात स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण सोहळा झाला. विविध १२ गटातील प्रथम येणाऱ्या जलतरणपटंूना प्रमाणपत्र, पदक, रोख रक्कम व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तर सहभागी स्पर्धकांचा पदक, सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. दिव्यांग व गतिमंद मुलांच्या गटात सुमारे २०० दिव्यांगांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटीच्या जीवरक्षकांच्या टीमसह स्थानिकांची सुरक्षा पथके कार्यरत होती. पोलीस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त असल्याने वाहतूक कोंडीची समस्या जाणवली नाही. मात्र, स्पर्धेदरम्यान तीन स्पर्धक पाण्यात बुडाल्याची घटना घडली. यावेळी जीवरक्षकांनी त्यांना समुद्राबाहेर काढले. आयोजकांनी स्पर्धकांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले.
स्पर्धेचा निकाल : अहिका हेलगेकर, वेदांत मिसळे प्रथम
५०० मीटर - वयोगट ६ ते ८ वर्षे - मुली प्रथम : अहिका हेलगेकर (बेळगाव), मुले प्रथम : वेदांत मिसळे (बेळगाव).
१ किलोमीटर - वयोगट ९ ते १० वर्षे - मुली प्रथम : नियशी रुहिल (मुंबई उपनगर), मुले प्रथम : आदित्य घाग (ठाणे), गतिमंद - महिला प्रथम : जिया राय (मुंबई), पुरुष प्रथम : दक्ष फडके (नागपूर),
२ किलोमीटर - वयोगट ११ ते १२ - मुली प्रथम : वैष्णवी अहिर (नाशिक), मुले प्रथम : नील वैद्य (रायगड), ५५ वर्षांवरील - महिला प्रथम : वर्षा कुलकर्णी (सांगली), पुरुष प्रथम : कलाप्पा पाटील (बेळगाव), दिव्यांग - महिला प्रथम : सिद्धी भांडारकर (नाशिक), पुरुष प्रथम : आदेश रुकडीकर (कोल्हापूर).
३ किलोमीटर - वयोगट १३ ते १५ - मुली प्रथम : संजना जोशी (नागपूर), मुले प्रथम : आदित्य हिप्परगी (सोलापूर). वयोगट २६ ते ३५- महिला प्रथम : सोनाली वेंगुर्लेकर (बेळगाव), पुरुष प्रथम : सिद्धार्थ घाग (पुणे). वयोगट ४६ ते ५५ - महिला प्रथम : सुखजित कौर (मुंबई), पुरुष प्रथम : संजय जाधव (सांगली).
५ किलोमीटर - वयोगट १६ ते १९ - मुली प्रथम : हिमानी फडके (नागपूर), मुले प्रथम : पृथ्वीराज डांगे (कोल्हापूर). वयोगट २० ते २५ - मुली प्रथम : सुबिया मुल्लानी, मुले : मयांक अग्रवाल (ठाणे), वयोगट ३६ ते ४५ - महिला प्रथम : उत्तरा पिठे (नाशिक), पुरुष प्रथम : संदीप भोईर (रायगड).

Web Title: Domination of Mumbai, Nashik, Kolhapur, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.