एकनाथ शिंदे मातोश्रीवर आल्यास आश्चर्य वाटायला नको, विनायक राऊतांचे भाकीत
By अनंत खं.जाधव | Published: August 14, 2023 04:11 PM2023-08-14T16:11:47+5:302023-08-14T16:13:57+5:30
पत्रकारांशी सोडा पंतप्रधान संसदेत येऊन बोलत नाहीत
सावंतवाडी : राष्ट्रवादीचा एक गट अजित पवार यांच्यासमवेत सरकारमध्ये समाविष्ट झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्यासोबत गेलेले 40 आमदार सध्या अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे भविष्यात शिंदे माफी मागायला मातोश्रीवर आले तर आर्शचय वाटायला नको असे भाकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी वर्तविले.
मात्र याचा सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाच असल्याचे मत ही यावेळी व्यक्त केले. ते सावंतवाडी येथे एका शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बाबुराव धुरी मायकल डिसोझा, बाळू माळकर, बाळा गावडे, आबा सावंत, श्रुतिका दळवी आदी उपस्थित होते.
राऊत म्हणाले, शिक्षणमंत्री दिपक केसरकर व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात विस्तव सुध्दा जात नाही. दोघांत स्पर्धा वाढली आहे. त्याचे टोकाचे वाद हे सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या विकासाच्या आड येत आहेत. पण ते योग्य नाही.
पत्रकारांशी सोडा पंतप्रधान संसदेत येऊन बोलत नाहीत
मणिपूर सारखे राज्य गेले तीन महिने पेटत आहे. त्याकडे बघायला कोणाला वेळ नाही. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ दोन ते तीन महिने बोलतात याला काय म्हणायचे पंतप्रधान पत्रकारांशी सोडा संसदेत येऊन बोलत नाहीत पण त्यांना काय म्हणायचे असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.
भविष्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची वाटचाल खडतर आहे. त्यांच्या सोबत गेलेल्यांना उमेदवारी मिळणार की नाही यात शंका आहे. त्यातच अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणखी अस्वस्थ झाले असून भविष्यात मातोश्रीवर माफी मागण्यास आले तर आर्शचय वाटायला नको असे भाकित त्यांनी व्यक्त केले.
हत्ती हटावसाठी आसाम ऐवजी कर्नाटक मधून टीम बोलवा
हत्तीचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यासाठी आसाम येथील पथक न आणता कर्नाटक मधील पथक आणा मी स्वत: यासाठी पूर्ण सहकार्य करेल. मागच्या वेळचा इतिहास पाहता कर्नाटकमधीलच तज्ञ लोक हत्तीचा बंदोबस्त करतील असेही राऊत म्हणाले.