विनाकारण आरोप करून जिल्हा बँकेची बदनामी करू नका : सतीश सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 05:10 PM2020-12-03T17:10:29+5:302020-12-03T17:13:07+5:30

SatishSawant, Nitesh Rane, Banking Sector, sindhudurg सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राजकारण्यांनी विनाकारण आरोप करून बदनामी करू नये. या बँकेत शेतकऱ्यांसह साडेचार लाख ठेवीदारांच्या ठेवी आहेत. त्यांचा विश्वासाला तडा जाईल असे राजकारण्यांनी करू नये, असा सल्ला जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी विरोधकांना पत्रकार परिषदेत दिला आहे.

Don't defame District Bank by making baseless allegations: Satish Sawant | विनाकारण आरोप करून जिल्हा बँकेची बदनामी करू नका : सतीश सावंत

विनाकारण आरोप करून जिल्हा बँकेची बदनामी करू नका : सतीश सावंत

googlenewsNext
ठळक मुद्दे विनाकारण आरोप करून जिल्हा बँकेची बदनामी करू नका : सतीश सावंत बँकेतील साडेचार लाख ठेवीदारांच्या विश्वासाला तडा जाईल

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत अपुरा कर्मचारीवर्ग असल्याने ग्राहकांना तत्पर सेवा देता यावी यासाठी काही कर्मचारी केवळ दैनंदिन मानधनावर घेण्यात आले आहेत. त्यामुळे ही नोकर भरती नाही. असे सांगतानाच सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची व शेतकऱ्यांच्या घामातून निर्माण झालेली सहकारी बँक आहे.

आजपर्यंत या बँकेने शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. त्यामुळे या बँकेवर राजकारण्यांनी विनाकारण आरोप करून बँकेची बदनामी करू नये. या बँकेत शेतकऱ्यांसह साडेचार लाख ठेवीदारांच्या ठेवी आहेत. त्यांचा विश्वासाला तडा जाईल असे राजकारण्यांनी करू नये, असा सल्ला जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी विरोधकांना पत्रकार परिषदेत दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्हिक्टर डान्टस, विकास सावंत, विकास गावडे, आत्माराम ओटवणेकर, प्रज्ञा सावंत, प्रमोद धुरी आदी बँकेचे संचालक उपस्थित होते.

यावेळी सतीश सावंत म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या २०१८-१९चे नाबार्डकडून करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये बँकेला अ वर्ग मिळाला आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने अ वर्ग बँकेला मिळत आहे. कोरोना कालावधीतही या बँकेचा एनपीए शून्य टक्के राहिला आहे.

१२२७ सभासद संस्था व साडेचार लाख ठेवीदार या बँकेचे आहेत. कोरोना कालावधीत शेतकऱ्यांना या बँकेने चांगली सुविधा पुरविली आहे. बँकेच्या व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट ठेवीदारांच्या ठेवी वाढल्या आहेत. संचालक मंडळाने चांगले काम केले आहे. पारदर्शक कारभार करण्याचे काम संचालक मंडळाने केले आहे. असे असतानाही काही राजकारणी बँकेत पैसे घेऊन नोकर भरती केली असल्याचे बँकेवर उलट सुलट आरोप करून बँकेला बदनाम करण्याचे कारस्थान करीत आहेत.

मुळात जिल्हा बँकेकडे कर्मचारी वर्ग अपुरा आहे. मात्र, नोकर भरती ही सध्या बंद आहे. त्यामुळे नोकर भरती करण्यात आलेली नाही. जिल्हा बँक ही राजकीय संस्था नाही. तर गोरगरीब जनतेची बँक आहे. राजन तेली हे नेहमीच राजकीय अड्ड्यावर बसणारे आहेत. राजन तेली हे जिल्हा बँकेचे राजकीय दुकान करू इच्छित आहेत. मात्र, हे आम्ही होऊ देणार नाही. महाविकास आघाडी एकत्रितपणे जिल्हा बँक निवडणूक लढणार असल्याचेही सावंत म्हणाले.

बँकेने सूडबुद्धीने कोणावरही कारवाई केली नाही

कर्जाची वसुली करणे हा बँकेचा अधिकार आहे आणि ती प्रक्रिया प्रशासन पार पाडत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने ३०० जणांवर १०१ (जप्तीची) ची कारवाई करण्याचे प्रस्तावित केली आहे. यामध्ये बिनशेती, घरदुरूस्ती व गाड्यांचा समावेश आहे. यात १२ गाड्यांचा समावेश आहे. ही बँकेने केलेली कारवाई कोणावर सूडबुद्धीने केली नसल्याचेही बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Don't defame District Bank by making baseless allegations: Satish Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.