नवीन घरांना होणार दुप्पट कर आकारणी
By admin | Published: November 25, 2015 11:20 PM2015-11-25T23:20:34+5:302015-11-25T23:20:34+5:30
सुधारीत नियमाचा मसुदा : जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत माहिती
सिंधुदुर्गनगरी : नव्याने वसूल केल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींना कर व फी संदर्भात शासनाने पुन्हा सुधारीत नियमाचा मसुदा प्रस्तावित केला आहे. त्यानुसार नवीन घरांच्या व इमारतींच्या कि मतीनुसार (मुल्यानुरूप) होणाऱ्या कर आकारणीतून या मसुद्यानुसार नवीन घरांना व इमारतींना दुप्पट आकारणी बसणार आहे. तर ४० वर्षापूर्वीच्या जुन्या घरांना व इमारतींना पूर्वी लागू केलेल्या कर आकारणीच्या ५० टक्के कमी दराने कर आकारणी भरावी लागणार असल्याचे शासनाने परिपत्रक काढले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत देण्यात आली.
महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम यात सुधारणा करण्यासाठी शासनाने २० जुलै २०१५ रोजी अधिसूचना जारी केली होती. त्यात घराच्या क्षेत्रफळावर आधारित घरपट्टी बंद करत ती घराच्या मुल्यावर घेतली जाणार असल्याचे सांगत दर दोन ते तीन पटीने वाढवले होते. यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या. राज्यात एकमेव सिंधुुदुर्ग जिल्ह्याने या अधिसुुचनेला आक्षेप घेत मोठ्याप्रमाणात हरकती नोंदविल्या होत्या.
५ आॅगष्टपर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत होती. या हरकतीवर विचार करून शासनाने सुधारीत ग्रामपंचायत कर व फी या संदर्भात नव्याने अधिसूचना जारी केली
आहे. (प्रतिनिधी)
नवीन अधिसूचना जारी
४पत्रा किं वा कौलारू घरांना पूर्वी ५० रूपये असणारा दर आता १०० रूपये होणार आहे. पत्रा किंवा छप्पराचे घर असणाऱ्यांना १५० रू दर होता. तो आता नव्याने ३३५ रूपये होणार आहे.
४तर नवीन आर.सी.सी. पद्धतीच्या घरांना पूर्वी ५०० रूपये क र आकारणी होती तीच आता नव्याने ८५९ रू पये कर आकारणी होणार आहे.
४गवती घर व ४० वर्षापूर्वी असणाऱ्या घरांची घरपट्टी आकारणी कमी करत थोडासा दिलासा दिला आहे. वरीलप्रमाणेच ज्या घरांना ५० रूपये घरपट्टी होती. त्या ठिकाणी २० रूपये तर पत्र्यांच्या घरांना १०० रूपये आकारणी होती ती ४१ रू पयेपर्यंत तर आर.सी.सी. घरांना ५०० रूपये असणारी घरपट्टी आता १७१ रूपये पर्यंत येणार आहे. अशी नव्याने अधिसूचना शासनाने जारी केली आहे.