डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या प्रेरणेने विकासाची समान संधी

By admin | Published: April 15, 2017 01:06 PM2017-04-15T13:06:08+5:302017-04-15T13:06:08+5:30

पालकमंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन

Dr. Equal opportunity for development by the inspiration of Dr. Babasaheb Ambedkar | डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या प्रेरणेने विकासाची समान संधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या प्रेरणेने विकासाची समान संधी

Next

सिंधुदुर्गनगरी, दि. १५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक भेदभावातून जे जे पाहिले, अनुभवले तसे कटू अनुभव येणा-या नवीन पिढ्यांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून स्वातंत्र्य, समता व बंधुता हा भारतीय राज्यघटनेचा पाया असावा असा डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा आग्रह होता. भावी पिढ्यांना सर्वांगीण विकासाची समान संधी मिळावी ही त्यांची प्रेरणा होती असे प्रतिपादन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती वर्षानिमित्त सामाजिक समता सप्ताहाचा सांगता कार्यक्रम कणकवली महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी आमदार वैभव नाईक,अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, कणकवलीचे तहसिलदार गणेश महाडिक, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे, विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता सोरटे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक के.डी. जाधव, प्रमुख वक्ते नवनाथ जाधव, गृहपाल व्यंकटेश साळे आदी उपस्थित होते.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. डॉ.आंबेडकर समाजव्यवस्थेची आपल्या बुध्दीमत्तेने घडी बसवली. त्यांचे जीवन संघर्षमय होते. त्यांनी पावलोपावली मानसन्मान न मानता प्रत्येक क्षेत्रात त्यांनी ज्ञानाचा ठसा उमटविला. समाजाचे व मानवजातीचे कल्याण होण्यासाठी ते झगडत राहिले.

डॉ. आंबेडकर यांच्याविषयी इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या सप्ताहानिमित्त कणकवली महाविद्यालयात आयोजित विविध स्पर्धेनिमित्त गुणवंत विद्याथ्यार्ना सत्कार करण्यात आला.

डिजीधन मेळाव्यात भीम अ‍ॅपचे अनावरण


डॉ. बाबासाहेबांच्या जन्मदिनी दीक्षाभूमीचे दर्शन घेण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीम आधार अ‍ॅपचे अनावरन केले. डीजीधन या योजनेव्दारे भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्याचे आमचे स्वप्न आहे. मोबाइलच प्रत्येकांची बँक बनावे आणि आपल्या हाताचा अंगठा हा त्या बँकेची चावी बनावी. असे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
भाषणाचे थेट प्रक्षेपण यावेळी दाखविण्यात आले. या डिजीधन मेळाव्यात भीम अ‍ॅपचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच काही युवकांनी भिम अ‍ॅप अपलोड करून घेतले. याद्यारे त्यांनी कॅशलेस व्यवहाराचे प्रात्यक्षिकेही केले.

Web Title: Dr. Equal opportunity for development by the inspiration of Dr. Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.