समस्यांवर तोडगा काढा, अन्यथा माझ्याशी गाठ : नीतेश राणे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:24 AM2019-05-11T11:24:35+5:302019-05-11T11:26:33+5:30

कणकवलीत चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. दिवसेंदिवस वाहतूक कोंडी होत आहे. धुळीच्या प्रादुर्भावाने सर्वसामान्य लोक आजारी पडू लागले आहेत. गांगो मंदिरासमोर अंडरपास न झाल्यास फार वेगळे परिणाम होतील. गोड बोलून लोकांच्या जमिनी घेईपर्यंत शांत बसलात का? शहराची जबाबदारी कोण घेणार? सर्व समस्या लवकरात लवकर न सुटल्यास माझ्याशी गाठ आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना आमदार नीतेश राणे यांनी खडसावले.

Draw a settlement on problems, otherwise touch me: Nitesh Rane's warning | समस्यांवर तोडगा काढा, अन्यथा माझ्याशी गाठ : नीतेश राणे यांचा इशारा

कणकवली नगराध्यक्षांच्या दालनात शहरातील विविध समस्यांबाबत नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच प्रकाश शेडेकर यांनी चर्चा केली. यावेळी रवी कुमार, रवींद्र गायकवाड, राकेश राणे, संजय कामतेकर, बंडू हर्णे आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देसमस्यांवर तोडगा काढा, अन्यथा माझ्याशी गाठ  : नीतेश राणे यांचा इशारा लोकांच्या मागणीप्रमाणेच कणकवलीत काम झाले पाहिजे

कणकवली : कणकवलीत चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. दिवसेंदिवस वाहतूक कोंडी होत आहे. धुळीच्या प्रादुर्भावाने सर्वसामान्य लोक आजारी पडू लागले आहेत. गांगो मंदिरासमोर अंडरपास न झाल्यास फार वेगळे परिणाम होतील. गोड बोलून लोकांच्या जमिनी घेईपर्यंत शांत बसलात का? शहराची जबाबदारी कोण घेणार? सर्व समस्या लवकरात लवकर न सुटल्यास माझ्याशी गाठ आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना आमदार नीतेश राणे यांनी खडसावले.

कणकवली नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षांच्या दालनात गुरुवारी झालेल्या बैठकीत आमदार नीतेश राणे यांनी प्रकाश शेडेकर, दिलीप बिल्डकॉनचे प्रोजेक्ट मॅनेजर रवी कुमार यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, स्वाभिमानचे शहराध्यक्ष राकेश राणे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, सचिन म्हाडगुत, अनिल शेटये, शिशिर परूळेकर, सोमनाथ गायकवाड, रामदास मांजरेकर, संदीप नलावडे, अभय राणे, किशोर राणे, आनंद राणे यांच्यासह प्रकल्पबाधित व शहरातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी नीतेश राणे म्हणाले, पावसाळ्यात तुम्हांला कणकवलीला बुडवायचे आहे का? आम्ही जमिनी दिल्या, त्यामुळे लोकांच्या मागणीप्रमाणेच काम झाले पाहिजे़. कणकवलीत चौपदरीकरणाचे काम तुम्ही करता ना? मग वाहतूक कोंडी, तुंबलेली गटारे, धुळीच्या प्रादुर्भावावर कोण काम करणार? केलेल्या कामावर कोण पाणी मारणार? सर्व्हिस रोड केव्हा पूर्ण करणार? तुटलेली पाईपलाईन केव्हा सुरळीत करणार? पथदीप बंद केले ते कधी चालू करणार? या सगळ्या प्रश्नांवर तुम्हीच काम केले पाहिजे़ नुसती बोलबच्चनगिरी आता बंद करा. गोड बोलून आम्ही फसणार नाही, अशा शब्दांत प्रकाश शेडेकर यांच्यावर नीतेश राणे यांनी आगपाखड केली. जनतेच्या अडचणी न सोडविल्यास कणकवलीचा आमदार म्हणून मी गप्प बसणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले, कणकवलीत नागरिकांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. कणकवली शहरातील चौपदरीकरणाचे काम जानेवारी २०२० पर्यंत पूर्ण झाले पाहिजे. चुकीच्या पद्धतीने इमारती तोडू नयेत. अधिकारी काय कणकवलीचे जावई नाहीत. माझ्याकडे यापुढे कोणत्याही तक्रारी येता नयेत. एक जरी तक्रार आली तरी गप्प बसणार नाही, अशा सूचनाही राणे यांनी महामार्ग ठेकेदार कंपनीचे ठेकेदार रवी कुमार आणि प्रकाश शेडेकर यांना दिल्या.

यावेळी संतप्त झालेल्या आमदार राणे यांनी काही वेळातच या अधिकाऱ्यांविरोधात कठोर भूमिका मांडत पुढील कार्यक्रमासाठी जाणे पसंत केले. त्यानंतर प्रकाश शेडेकर यांनी कणकवलीतील धुळीचा प्रादुर्भाव, सर्व्हिस रस्ते, स्ट्रीटलाईट तसेच धुळीवर पाणी मारण्याचे काम केले जाईल. तसेच गांगोमंदिर येथील अंडरपास जागेच्या ठिकाणी काम करणार नसल्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक बंडू हर्णे यांच्यासह शहरातील नागरिकांनीही विविध प्रश्नांवर शेडेकर यांना चांगलेच धारेवर धरले.

...तर महामार्गाचे काम बंद पाडणार!

शहरातील गांगो मंदिर येथे अंडरपास व्हायलाच हवा. हे काम न झाल्यास डीपी रस्त्यापुढील उड्डाणपुलाचा एकही पिलर उभा करू दिला जाणार नाही. पावसाळ्यापूर्वी महामार्ग दुतर्फा सर्व गटार बांधकामे आणि सांडपाणी निचरा व्यवस्था व्हायला हवी. याबाबत दिरंगाई झाली तर महामार्गाचे काम रोखू.

शहरात दिवसातून तीन वेळा रस्त्यावर पाणी मारणे अत्यावश्यक आहे. याखेरीज वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्व्हिस रोडची रुंदी वाढविण्यात यावी. नगरपंचायतीची पाणीलाईन आणि गटारलाईन उभारून देण्यात यावी. तसेच मागील आठवड्यात ज्या ज्या ठिकाणी संयुक्त पाहणी झाली तेथील कामे पुढील चार दिवसांत व्हायला हवी़त. पावसाळ्यात शहरात पाणी साठण्याची समस्या कुठेही होता नये. जर समस्या उद्भवली तर गप्प बसणार नाही, असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला.

 

Web Title: Draw a settlement on problems, otherwise touch me: Nitesh Rane's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.