दोडामार्ग-तिलारी मार्गावर जीर्ण झाडांचा धोका

By admin | Published: May 22, 2014 12:56 AM2014-05-22T00:56:26+5:302014-05-22T01:01:49+5:30

वाहतुकीस अडथळा

Drought road risk on Doda road-Tilari | दोडामार्ग-तिलारी मार्गावर जीर्ण झाडांचा धोका

दोडामार्ग-तिलारी मार्गावर जीर्ण झाडांचा धोका

Next

 दोडामार्ग : दोडामार्ग-तिलारी मार्गावर मोठ्या प्रमाणात जीर्ण धोकादायक झाडे आहेत. पावसाळ्यात वाहतुकीस अडथळा ठरणार आहेत. त्यामुळे ही धोकादायक झालेली झाडे तोडण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांतून होत आहे. दोडामार्ग तिलारी हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून अवजड मालाची वाहतूक करणारी वाहने शिवाय प्रवाशी वाहनाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शिवाय बेळगाव व गोवा याठिकाणी ये- जा करण्यासाठी या मार्गाचा अवलंब मोठ्या प्रमाणात होतो. या मार्गालगत येणार्‍या पट्ट्यात दरवर्षी पावसाची हजेरी मोठ्या प्रमाणात असते. शिवाय या भागात वादळी वार्‍यासह पाऊस होतो. त्यामुळे रस्त्याशेजारी असणारी झाडे किंवा जीर्ण झालेल्या फांद्या महामार्गावर पडतात. परिणामी वाहतुकीचा खोळंबा उडतो. त्याशिवाय रस्त्यालगतचे एखादे झाड वाहनावर पडल्यास मोठ्या प्रमाणात धोका उद्भवू शकतो. त्यामुळे ही लगतची झाडे वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक आहेत. रस्त्याच्या इतकी दुतर्फा असलेल्या झाडे ही पुरातन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वार्‍याचा झोत आल्यास कधीही कोलमडू शकतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणार्‍या या परिस्थितीची गांभीर्यता लक्षात घेऊन रस्त्यात साईडपट्टी लगत लोंबकळत असलेली झाडे अथवा फांद्या तोडल्यास वाहतुकीचा पावसाळयात होणारा धोका टळणार आहे. त्यामुळे रस्त्यालगतची जीर्ण व धोकादायक झाडे तोडण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Drought road risk on Doda road-Tilari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.