बांदा येथे दारुच्या नशेत बांबूने मारहाण; युवक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 04:47 PM2019-07-30T16:47:50+5:302019-07-30T16:48:32+5:30
बांदा-निमजगा येथे दारुच्या नशेत झालेल्या भांडणातून बांबूने मारहाण केल्याप्रकरणी गुरुप्रसाद गडेकर (३२) हे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी गुरुप्रसाद यांच्या पत्नी गायत्री यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बांदा पोलिसांनी शिवाजी नाईक (३५) व सागर नाईक (२८) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा दोघांना ताब्यात घेण्यात आले.
बांदा : बांदा-निमजगा येथे दारुच्या नशेत झालेल्या भांडणातून बांबूने मारहाण केल्याप्रकरणी गुरुप्रसाद गडेकर (३२) हे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी गुरुप्रसाद यांच्या पत्नी गायत्री यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बांदा पोलिसांनी शिवाजी नाईक (३५) व सागर नाईक (२८) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा दोघांना ताब्यात घेण्यात आले.
याबाबत बांदा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गडेकर हे शिवाजी नाईक व अन्य मित्रांसह निमजगा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मालकीच्या जागेत जेवणाची पार्टी करीत होते. त्यावेळी दारुच्या नशेत जेवणाना बोलण्यातून शिवाजी व गुरुप्रसाद यांच्यात भांडण झाले.
त्यावेळी शिवाजी याचा भाऊ सागर हा घटनास्थळी होता. त्या दोघांनी मिळून आपल्या पतीला बांबूच्या सहाय्याने डोक्यावर, छातीवर व पायावर मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी बांदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा दोघांना ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी संशयितांना सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे बांदा पोलिसांनी सांगितले.