नवीन घर बांधणाºयांची दमछाक-- ग्रामपंचायतीच्या अखत्यारित बरे होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 10:28 PM2017-09-08T22:28:14+5:302017-09-08T22:30:08+5:30
कणकवली : ग्रामपंचायत क्षेत्रात नवीन घर बांधणाºयांची कागदपत्रे जमविताना दमछाक झाली आहे. पूर्वी ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रात होते ते बरे होते.
प्रदीप भोवड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कणकवली : ग्रामपंचायत क्षेत्रात नवीन घर बांधणाºयांची कागदपत्रे जमविताना दमछाक झाली आहे. पूर्वी ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रात होते ते बरे होते. आता तहसील कार्यालयाच्या अधिकारात नवीन घर बांधणी आल्यामुळे नवीन घर बांधणीचे १९ दाखले मिळविताना घर मालकाला घर बांधणे नकोसे झाले आहे. त्यामुळे नवीन घर बांधणीचे अधिकार पुन्हा ग्रामपंचायतीकडे द्यावेत व ग्रामस्थांची ससेहोलपट थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नवीन घर बांधताना सात-बारा उताºयाच्या अलीकडच्या काळातील मूळ ७ प्रति, मूळ प्रतिच्या मोजणीचा उतारा २ प्रतित, इमारत दाखविणारा आर्किटेक्चर/इंजिनिअर यांच्याकडील १:५०० प्रमाणात नकाशा ७ प्रतित, जमीन रेल्वेच्या हद्दीच्या ३० मीटर आत असल्यास रेल्वे खात्याचा ना हरकत दाखला, उच्च दाबाच्या विद्युत वाहन तारा जमिनीवरून व जमिनीपासून १५ मीटरपेक्षा कमी अंतरावरून जात असल्यास विद्युत मंडळाचा दाखला, जमीन कुठल्याही मार्गाच्या किंवा १९८१ व २००१ च्या आराखड्यात प्रस्तावित मार्गाच्या जवळपास असल्यास संबंधित खात्याचे अभिप्राय दोन प्रतित, घर पाटबंधारे प्रकल्प लाभक्षेत्रात येत असल्यास संबंधित खात्याचा जिल्हा पुनर्वसन खात्याचा दाखला, लाभक्षेत्रात व आठ एकरपेक्षा कमी क्षेत्रात असलेल्या १०० रुपयांच्या स्टॅप पेपरवर प्रतिज्ञापत्र, जमिनीतील हितसंबंधितांचे संमतीपत्र, जमिनीवर कर्जाचा बोजा असलेला संबंधित खाते/बँक यांचा ना हरकत दाखला, जोड रस्ता खासगी जमिनीतून जात असल्यास जमीन मालकाची संमती, जमीन नियंत्रण सत्ता प्रकार/वर्ग २ ची असल्यास संबंधित अधिकारी यांच्याकडील कूळ कायदा कलम ४३ प्रमाणे परवानगी, ७/१२ उताºयात नमूद असलेल्या क्रमांकाचे सर्व उतारे असल्यास खरेदीखत २ प्रतित, ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला, आरोग्य खात्याचा दाखला, ७/१२ उताºयाप्रमाणे जागेची हद्द व लगतच्या रस्त्याची आखणी रुंदी दर्शविणारा गट बुक उतारा अथवा उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडील नकाशा२ प्रतित, विकासकरार व कुलमुखत्यार पत्र २ प्रतित, पूर्वमंजूर बिनशेती आदेश व नकाशा २ प्रतित, पोच रस्त्याबाबतचा पुरावा (उदा. २६ नंबर) असे १९ पुरावे नवीन घर बांधणी प्रकरणासोबत जोडावयाचे आहेत.
सरकारी कार्यालयांमध्ये जागा रिक्त किती आहेत हे प्रत्येक सरकारी अधिकाºयाला माहीत आहे. सर्कल, तलाठी व संबंधित १९ खात्यांचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयात किती उपस्थित असतात ते घर बांधणाºयाला माहीत आहे. घर बांधून पाहावे व लग्न करून पाहावे, अशी म्हण आहे. घर बांधताना काय काय करावे लागते. सामानाची जुळवाजुळव, पैशांची जमवाजमव करताना मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्याला पुन्हा हे १९ दाखले जमा करताना घाम फुटतो आहे.
सध्याची अवस्था पाहिल्यास कागदपत्रे मिळवायला एक वर्ष व घर बांधायला एक वर्ष अशा प्रकारे दोन वर्षे नवीन घर बांधायला लागणार आहेत. तरी मंत्री महोदयांनी याचा विचार करून ग्रामस्थांना त्रास देण्यापेक्षा उपलब्ध कर्मचारी वर्गाचा विचार करून आवश्यक कागदपत्रेच घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सात-बारा उतारा, भूमी अभिलेखचा नकाशा, विजेच्या तारा घरावरून जात असल्यास वीज मंडळाचा ना हरकत दाखला, जमीनदारांचे संमतीपत्र, खरेदीखत, ग्रामपंचायत ना हरकत दाखला, रस्त्याबाबतचा पुरावा असे सात दाखले पुरेसे आहेत; पण नवीन घर बांधणीसाठी वेठीस धरणे चुकीचे असल्याचे मत आडवली येथील सतीश कदम यांनी व्यक्त केले आहे.
‘अच्छे दिन’चे स्वप्नच
ओरोस, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, तलाठी, सर्कल, इंजिनिअर, वीज मंडळ, पुनर्वसन खाते, बँक, सोसायटी, आरोग्य केंद्र, भूमी अभिलेख यांचे हुंबरटे झिजवून नवीन घर बांधणारा कंटाळला आहे. ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशी म्हणण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न हे स्वप्नच राहिले; पण ग्रामस्थांच्या पदरी मात्र निराशा आली आहे. रिक्त पदांमुळे ग्रामस्थांना त्रास
नवीन घर बांधणाºयाला सर्व सरकारी कार्यालये चांगलीच माहिती पडत आहेत. रिक्त जागा किती आहेत. कुठले तलाठी कधी भेटतात. कुठले सर्कल केव्हा भेटतात. हे नवीन घर बांधणाºयाला विचारावे, अशी सध्याची स्थिती आहे. रिक्त पदांमुळे ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नवीन घर बांधणाºयांच्या अनुभवाचे संकलन केल्यास एक चांगले पुस्तक तयार होणार आहे. सरकारी कर्मचारी कसा राग काढतात, याचेही दाखले नवीन घर बांधणाºयाकडे मिळतील.
‘भाजप’ला इशारा
नवीन घर बांधणीचे अधिकार राज्य सरकारने ग्रामपंचायतींना द्यावेत. ग्रामपंचायत आपल्या हद्दीतील घराचे काय करायचे ते बघेल, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील व तहसील कार्यालयातील अधिकाºयाला गावातील घरांची कल्पना नसते व त्यांच्या मागून फिरताना ग्रामस्थ हैराण होतो. सरकारने नवीन घर बांधणीचे अधिकार ग्रामपंचायतीकडे न दिल्यास भाजपला निवडणुकीत जागा दाखवून देऊ, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.