गुहागरमध्ये दुर्गादेवी मंदिर वर्धापनदिन कार्यक्रम
By admin | Published: April 26, 2015 10:07 PM2015-04-26T22:07:06+5:302015-04-27T00:12:16+5:30
जागृत देवस्थान : गिरीष बापट यांचीही उपस्थिती
गुहागर : कोकणातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुहागरच्या श्री दुर्गादेवीच्या मंदिराचा आठवा वर्धापन दिन सोहळा ३० एप्रिल ते १ मे या दरम्यान विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.गुहागर २० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता मंत्रपठण व महापूजा, असून यात औरंगाबाद, नाशिक, देवरूख, हेदवी या ठिकाणच्या वेदपाठशाळेतील सुमारे १५० विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. यावेळी नाशिक येथील वथदक चुडामणी शांताराम भानुसे, औरंगाबाद येथील वेदमूर्ती दुर्गादरू मुळे, वेदमूर्ती योगेश सोहनी यांच्या अधिपत्याखाली कार्यक्रम होणार आहे. डॉ. राजेंद्र फडके व तुषार पेठे यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. देवस्थानने गतवर्षी संकल्प सोडलेल्या श्रींचा चांदीचा देव्हारा हा पूर्णत्वास आला असून त्याचे अनावरण अन्न नागरी पुरवठा व संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते सकाळी १० वा. होणार आहे. यावेळी आ. भास्कर जाधव, बाळ माने, प्रशांत शिरगावकर, विनायक मुळ्ये उपस्थित राहणार आहेत. रा. १०.३० वाजता मान्यवरांच्याहस्ते दुर्गाश्रीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रशासन व सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. दुपारी ११.३० वाजता वेदपाठ शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत व परिचय करुन सन्मान करण्यात येणार आहे. दुपारी ४.३० वाजता दुर्गादेवीची सवाद्य मिरवणूक काढून येथील ग्रामदेवतेची भेट होणार आहे. सायंकाळी ७ वाजता श्रींची पाद्यपूजा, पंचक्रोशीतून आलेल्या स्त्रियांकडून औक्षण व गोंधळ, आरती, मंत्रपुष्पांजली, प्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत.
रात्री ९.३० वाजता संगीत रजनी कार्यक्रमामध्ये प्रथमेश लघाटे, गझलकार कमोद सुभाष कला सादर करणार आहेत.
कार्यक्रमाबाबत माहिती देताना अध्यक्ष किरण खरे यांनी सांगितले की, वयोवृद्ध ग्रामस्थांना सुसज्ज आजी आजोबा उद्यान, मंदिर परिसराचे बंदिस्तीकरण व भक्त प्रवेश द्वार मंदिराला सुवर्ण कळस चढवण्याचे देवस्थानचे आगामी संकल्प सर्व भक्तांच्या मदतीने लवकरच पूर्णत्त्वास जातील असा विश्वास व्यक्त केला. सर्व कार्यक्रमास भक्तांनी उपस्थित राहवे, असे आवाहनही देवस्थानच्यातीने करण्यात आले.
यावेळी दुर्गादेवी देवस्थान अध्यक्ष किरण खरे, सचिव संतोष मावळणकर, डॉ. आनंद खरे, अतुल फडके, गणेश भिडे, विक्रांत खरे, अद्वैत गोखले, अमोद गोळे, विक्रम खरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)