उष्णजल प्रक्रिया अहवाल पंधरा दिवसांत

By admin | Published: March 17, 2015 11:45 PM2015-03-17T23:45:59+5:302015-03-18T00:05:02+5:30

आंब्यावर एक तास ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात.

During the thermal processing report in fifteen days | उष्णजल प्रक्रिया अहवाल पंधरा दिवसांत

उष्णजल प्रक्रिया अहवाल पंधरा दिवसांत

Next

रत्नागिरी : ज्या फळमाशीच्या कारणासाठी युरोपीय देशांनी हापूस नाकारला, ती फळमाशी नष्ट करण्यासाठी हापूसवर उष्णजल प्रक्रिया करणे गरजेचे आहे. पातळ सालीच्या हापूसला ही प्रक्रिया सहन होईल का, याबाबतचे संशोधन आंबा-काजू मंडळातर्फे केले जात आहे. अर्थात त्यासाठी प्रथम फळमाशी तयार करण्यापासून संशोधनाला सुरुवात करावी लागल्याने ‘उष्णजल’च्या अहवालासाठी आणखी १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आंब्यावर एक तास ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात. बैंगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशरसारख्या जातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी संबंधित प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
अवकाळीतून बचावलेला आंबा शेतकऱ्यांनी काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, पुणे तसेच अहमदाबाद येथील मार्केटमध्ये जिल्ह्यातून आंबा विक्रीस पाठविण्यात येत आहे. आंब्याचे प्रमाण कमी असले तरी दरही समाधानकारक नाहीत. १५०० ते ४००० रुपये इतका पेटीला भाव मिळत आहे. आंब्याच्या दर्जाप्रमाणे भाव असे व्यापारी सांगत असले तरी शेतकऱ्यांचे योग्य दराअभावी नुकसान होत आहेशेतकऱ्यांच्या आंब्याला चांगला दर मिळावा यासाठी परदेशात
आंबा पाठविला जातो. सध्या आखाती प्रदेश वगळला तर अन्य देशांनी घातलेल्या जाचक अटीमुळे
सर्रास शेतकऱ्यांना आंबा विक्रीला पाठविणे शक्य होत नाही. बहुधा एप्रिल, मे मध्येच आंबा परदेशात पाठविण्यात येतो. आंबा काजू बोर्डातर्फे पणन विभागामध्ये याबाबतचे संशोधन केले जात आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)


आधी फळमाशीची निर्मिती
आंब्यावर १५ एप्रिलनंतर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो; परंतु यासंबंधी तातडीने अहवाल पाठविण्यासाठी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी प्रथम पेरूतून फळमाशी निर्मिती, त्यानंतरच फळमाशीचा आंब्यावरील परिणाम व आंब्यावरील उष्णजल प्रक्रिया, त्याचा फळमाशीवर होणारा परिणाम अशा टप्प्याटप्प्याने संशोधन होत आहे. मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्राथमिक अहवाल तयार होईल, असे अपेक्षित आहे.

Web Title: During the thermal processing report in fifteen days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.