ज्युदो कराटे स्पर्धेत आठ सुवर्णपदके, दोन कांस्यपदकांची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 14:10 IST2020-12-25T14:09:15+5:302020-12-25T14:10:08+5:30
Sawantwadi SindhudurgNews- कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे घेण्यात आलेल्या युथ गेम महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो कराटे असोसिएशन सावंतवाडी या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश संपादन करीत आठ सुवर्णपदके व २ कांस्यपदकांची कमाई केली.

सावंतवाडी संस्थानच्या श्रीमंत शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते ज्युदो कराटे स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
सावंतवाडी : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे घेण्यात आलेल्या युथ गेम महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो कराटे असोसिएशन सावंतवाडी या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश संपादन करीत आठ सुवर्णपदके व २ कांस्यपदकांची कमाई केली.
सावंतवाडी संस्थानच्या श्रीमंत शुभदादेवी खेमसावंत भोसले यांच्या हस्ते स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्पर्धेत एकूण १६ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी आठ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके व दोन विद्यार्थ्यांनी कांस्यपदकाची कमाई केली.
यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे - योगेश कृष्णा बेळगावकर - १९ वर्षांवरील - ७५ किलो - खुला गट प्रथम क्रमांक, वैष्णवी आनंद रासम - १९ वर्षांखालील - ६५ किलो प्रथम क्रमांक, तेजस भालचंद्र सुर्वे - १९ वर्षांवरील - ५५ किलो प्रथम क्रमांक, तेजसराव महेंद्र दळवी - १७ वर्षांखालील - ५० किलो प्रथम क्रमांक, प्रतीक्षा गजानन गावडे - १९ वर्षांखालील - ५७ किलो प्रथम क्रमांक, ओंकार संतोष गोसावी - १७ वर्षांखालील - ५५ किलो प्रथम क्रमांक, ललित गणेश हरमलकर - १९ वर्षांखालील - ८५ किलो प्रथम क्रमांक, प्रथमेश महेश कातळकर - १९ वर्षांखालील - ५५ किलोखाली - द्वितीय क्रमांक, गणेश नामदेव राऊळ - १९ वर्षांखालील - ३० किलो - द्वितीय क्रमांक या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले.