सत्ताधारी सरकारकडून कामगारांचे आर्थिक शोषण

By admin | Published: April 12, 2015 10:22 PM2015-04-12T22:22:22+5:302015-04-13T00:05:25+5:30

गुरुदास दासगुप्ता : कुडाळ येथील महाअधिवेशनाच्या सांगता समारंभात टीका

Economic exploitation of workers by the ruling government | सत्ताधारी सरकारकडून कामगारांचे आर्थिक शोषण

सत्ताधारी सरकारकडून कामगारांचे आर्थिक शोषण

Next

कुडाळ : सध्याच्या सरकारने हा देश भांडवलशाही परदेशी गुंतवणूकदारांच्या हाती देण्याचे ठरविले असून कामगार कायद्यात बदल करून येथील कामगार, शेतकऱ्यांचे आर्थिक व शारीरिक शोषण करण्याचे धोरण अवलंबिले असल्याने भविष्यकाळ अंधारमय होण्याची चिन्हे आहेत. या सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात पेटून उठून देशव्यापी आंदोलन छेडूया, असे आवाहन आॅल इंडिया ग्रेड युनियनचे काँग्रेसचे सरचिटणीस कॉम्रेड गुरुदास दासगुप्ता यांनी केले.ते कुडाळ येथील महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फाऊंडेशनने महाअधिवेशनाच्या सांगता समारंभात बोलत होते. महाअधिवेशनाचा सांगता सोहळा रविवारी सकाळी झाला. यावेळी आॅल इंडिया फेडरेशन आॅफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईजचे सरचिटणीस कॉ. चक्रधरप्रसाद सिंग (पाटणा बिहार), फेडरेशनचे कार्याध्यक्ष मोहन शर्मा, प्रभारी सरचिटणीस सी. एन. देशमुख, एम. के. चौरे, अनिला झोके, राज्य उपाध्यक्ष प्रदीप नेरूरकर, भाऊ पाटील, कृष्णा भोयर, दिलीप साळुंखे, डी. के. पात्रे, माधव लोकरे, मनोहर आचारे, सुहास वर्धम, संजय वरवडेकर, आलेखा शारबिद्रे, चंद्रभाऊ दिलीप पवार, ज्योती नटराजन व फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. भाजप सरकारवर हल्लाबोलयावेळी दासगुप्ता यांनी भाजप सरकारने कामगार शेतकरी विरोधी अवलंबिलेल्या धोरणाबात सरकारवर हल्लाबोल चढविला. दासगुप्ता म्हणाले, देशात ८० टक्के शेतकरी जनता असून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. परंतु सरकार भांडवलशाही जनतेसोबत आहे. सरकार शेतकरी तसेच लहान व्यापाऱ्यांचे खच्चीकरण करण्याचे धोरण अवलंबित आहे. सरकारमुळे औद्योगिक उत्पादन घटलेले आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे. एकाच ठिकाणी थांबलेल्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकार योग्य ती पावले उचलत नाही. विकासाच्या योजना बंद करण्याच्या प्रयत्नात सरकार आहे. प्रत्येक विभाग क्षेत्र खासगीकरणाकडे न्यायचा सरकारचा प्रयत्न आहे. १८ कामगार कायद्यात बदल करून कामगारांविरोधात कायदे करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकरी, मजूर, कामगार यांचे आर्थिक शोषण करण्याचा कुटील डाव सरकार बनवित आहे. असे अनेक आरोप सध्याच्या भाजपा सरकारवर दासगुप्ता यांनी या अधिवेशनात करून भाजपा सरकावर हल्लाबोल केला. वर्कर्स फेडरेशनतर्फे कुडाळ शहरात रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात कुडाळ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Economic exploitation of workers by the ruling government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.