भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षण आवश्यक :नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 11:30 AM2021-02-03T11:30:44+5:302021-02-03T11:31:39+5:30

Nitesh Rane Sindhudurg- उपकार हा शब्द तुमच्या आमच्या नात्यात कधीही येता नये. मी तुमचा हक्काचा आमदार आहे. मुलगा, भाऊ या नात्याने हक्काने हाक द्या. कामे सांगा, मी ती पूर्ण करेन. भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे या क्षेत्रात जेवढे काम करू तेवढे कमीच आहे. असे प्रतिपादन भाजपा आमदार नीतेश राणे यांनी केले.

Education is necessary to shape the future generation: Nitesh Rane | भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षण आवश्यक :नीतेश राणे

भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षण आवश्यक :नीतेश राणे

Next
ठळक मुद्देभावी पिढी घडविण्यासाठी शिक्षण आवश्यक :नीतेश राणे हरकुळ बुद्रुक येथील कार्यक्रमात प्रतिपादन

कणकवली : उपकार हा शब्द तुमच्या आमच्या नात्यात कधीही येता नये. मी तुमचा हक्काचा आमदार आहे. मुलगा, भाऊ या नात्याने हक्काने हाक द्या. कामे सांगा, मी ती पूर्ण करेन. भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे या क्षेत्रात जेवढे काम करू तेवढे कमीच आहे. असे प्रतिपादन भाजपा आमदार नीतेश राणे यांनी केले.

अंजुमन ई खुद्दामुल मुस्लिमीन हायस्कूल, हरकुळ बुद्रुकला आमदार नीतेश राणे यांनी स्वखर्चाने स्कूलबस भेट दिली. त्या बसचे लोकार्पण आमदार राणे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष शहानवाज आदम खान यांच्याकडे चावी देऊन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत, हायस्कूलचे अध्यक्ष शहानवाज आदम खान, उपसभापती दिव्या पेडणेकर, माजी उपसभापती बाबा वर्देकर, सरपंच गौसिया पटेल, चेअरमन रईस पटेल, भाजपा कणकवली मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी उपसभापती बुलंद पटेल, राजू पेडणेकर, रमेश पावसकर, उपसरपंच चंद्रकांत परब, बाळा गावकर, रजाक बटवाले, मुख्याध्यापक नश्रीम डांगे, शहानवाज डांगे आदी उपस्थित होते.

नीतेश राणे म्हणाले, शिक्षण, आरोग्य आणि नोकरीत लोकांना फसवू नका. हे प्रश्न जेव्हा लोक घेऊन येतील तेव्हा कोणाला खाली हात जायला देऊ नका. हेच खरे काम आहे, अशी शिकवण माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आम्हाला दिली. त्याप्रमाणे आम्ही कार्यरत आहोत. त्यामुळे आमच्यावर टीका करणारे आणि विरोधात मते मागणारे यांनी आमच्या कामाची बरोबरी करून दाखवावी. एकादे काम नीतेश राणे करू शकले नाहीत तर आपण करतो असे म्हणून विरोधक का पुढे येत नाहीत. हरकुळ विभागातील हा पट्टा राणेंना मानणारा आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

 

Web Title: Education is necessary to shape the future generation: Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.