कुडाळमधील सहाजणांना शिक्षा

By admin | Published: September 7, 2015 09:42 PM2015-09-07T21:42:40+5:302015-09-07T21:42:40+5:30

तहसीलदारांच्या दालनात अनधिकृत प्रवेश प्रकरण

Education for six people in Kudal | कुडाळमधील सहाजणांना शिक्षा

कुडाळमधील सहाजणांना शिक्षा

Next

सिंधुदुर्गनगरी : कुडाळ येथील तत्कालीन तहसीलदार जयराज देशमुख यांच्या दालनात अनधिकृतरीत्या प्रवेश करून सरकारी कामात अडथळा व धमकी दिल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील कोतवाल यांनी आरोपी नित्यानंद तुकाराम शिरसाट याच्यासह सहाजणांना प्रत्येकी एक महिना कारावास व एक हजार रुपयांची शिक्षा दिली आहे. शिक्षा झालेले सर्वजण कुडाळ परिसरातील आहेत. तत्कालीन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी जयराज सदाशिव देशमुख यांच्या दालनात संबंधित सहाजणांनी अनधिकृतरीत्या प्रवेश करीत वाळू उत्खनन व वाहतुकीविरुद्ध आमच्यावर कारवाई का करता असे सांगून, देशमुख यांच्याशी हुज्जत घातली होती. अरेरावी करीत गोंधळ निर्माण केला होता. यापुढे आमच्यावर कारवाई केली तर परिणाम वाईट होतील, अशी धमकी दिली होती. हा प्रकार २६ नोव्हेंबर २०१३ रोजी दुपारी ३.३० वाजता घडला होता. याप्रकरणी ४ डिसेंबर २०१३ रोजी देशमुख यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार बेकायदेशीर जमाव करणे, लोकसेवकाला अटकाव करणे, अनधिकृतपणे घुसणे, धमकी देणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी कलमांन्वये आरोपी नित्यानंद शिरसाट (वय ३७), महेश तुकाराम शिरसाट (३५), नितीन रत्नाकर सावंत (३६), संदीप आत्माराम राऊळ (४७), संदेश अरविंद शिरसाट (३५), विजय सुरेश प्रभू (३५) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.या खटल्याच्या सुनावणीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कुडाळ यांनी वरील सहाही आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. हा निकाल ३१ आॅक्टोबर २०१४ रोजी देण्यात आला होता. दरम्यान, या निकालाविरोधात जिल्हा सरकारी अभियोक्ता अमोल सामंत यांनी सरकार पक्षातर्फे जिल्हा न्यायालयात २२ जानेवारी २०१५ रोजी अपील दाखल केले होते. या अपिलावर झालेल्या सुनावणीत वरील सहाही आरोपींना विविध कलमांखाली एक महिना कारावास व
५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. वरील शिक्षा एकत्रित भोगण्याचे आदेश देण्यात आले. सरकार पक्षाच्यावतीने सहायक सरकारी अभियोक्ता अवधूत भणगे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

जामीन मंजूर
दरम्यान, उच्च न्यायालयात जाण्यासाठी जामिनाची विनंती करण्यात आली होती. ती मान्य करीत न्यायालयाने प्रत्येकी १५ हजारांचा जामीन मंजूर करण्यात आला.

Web Title: Education for six people in Kudal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.