पोलिस वसाहत आठ दिवसानंतरही ‘तहानलेली’

By admin | Published: October 26, 2016 12:17 AM2016-10-26T00:17:45+5:302016-10-26T00:17:45+5:30

पोलिस कुटुंबियांची पालिकेवर धडक : पाणीपुरवठाप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी

Eight days after the police colony 'thirsty' | पोलिस वसाहत आठ दिवसानंतरही ‘तहानलेली’

पोलिस वसाहत आठ दिवसानंतरही ‘तहानलेली’

Next

मालवण : मालवण पोलिस वसाहतीत गेले आठ दिवस पाणीपुरवठा बंद आहे. याबाबत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही पाण्याची समस्या सुटली नाही. त्यामुळे संतप्त बनलेल्या पोलिस कुटुंबियांनी मंगळवारी थेट मालवण पालिकेवर धडक दिली.
प्रशासनाने पोलिस कुटुंबियांची होणारी गैरसोय जाणून ‘पाणी’ प्रश्न कायस्वरूपी सोडविण्याची मागणी केली. यावेळी मुख्याधिकारी रंजना गगे यांनी पोलिस वसाहतीला आजपासून अग्मिशमन बंब व विद्युत जनित्राच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्याचे सांगितले. मालवण पालिकेत महिला पोलिस कर्मचारी व पोलिस कुटुंबियांनी बंद पाणी पुरवठ्याचा पाढा वाचला. यापूर्वी होत असलेला पाणीपुरवठा अनेक वेळा गढूळ व जंतूयुक्त होत असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष घालून प्रश्न सोडवावा. पाणी पुरवठा गेला आठवडाभर बंद असल्याने पाणी विकत घेण्याची नामुष्की ओढवली आहे. सकाळच्या वेळी पालिकेकडून टँकरद्वारे करण्यात येणारा पाणीपुरवठाही वसाहतीपासून लांब असल्याने इतर घरगुती कामांवरही ताण पडत असल्याचे पोलिस कुटुंबियांनी सांगितले. यावेळी पालिकेत नगरसेवक सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, ममता वराडकर, मोहन वराडकर आदी उपस्थित होते. तात्पुरता पाणीपुरवठा सुरळीत न करता कायमस्वरूपी उपयोजना करून पोलिसांची ‘तहान’ भागवावी, अशीही मागणी पोलिस कुटुंबियांनी केली आहे. (प्रतिनिधी)
पालिका मागणार
ग्राहक मंचाकडे दाद
मालवण नगरपालिकेच्या एका पर्यटन संकुलात वीजचोरी होत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाने वीज वितरणच्या निदर्शनास आणून दिला होता. त्याप्रकरणी वीज वितरण कंपनीने पालिकेलाच वीजचोरीप्रकरणी १ लाख २६ हजाराचे दंडात्मक बिल सादर केले. हे अवास्तव बिल भरणा न केल्याने वीज वितरणने पाणीपुरवठा खंडित केला असे मुख्याधिकारी गगे यांनी स्पष्ट केले. याबाबत मालवण पालिका प्रशासन ग्राहक मंचाकडे दाद मागणार आहे, असेही गगे यांनी सांगितले.
 

Web Title: Eight days after the police colony 'thirsty'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.