९९ अंगणवाड्या होणार हायटेक, जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 10:53 AM2019-08-24T10:53:21+5:302019-08-24T10:54:52+5:30

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन मंडळमधून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९९ अंगणवाडी केंद्रांन डिजिटल बनविण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या ...

ेक High-tech, Anganwada will be funded through district planning | ९९ अंगणवाड्या होणार हायटेक, जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर

९९ अंगणवाड्या होणार हायटेक, जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर

googlenewsNext
ठळक मुद्दे९९ अंगणवाड्या होणार हायटेक, जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर महिला व बालकल्याण समिती सभेत  माहिती

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन मंडळमधून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९९ अंगणवाडी केंद्रांन डिजिटल बनविण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या अंगणवाड्या हायटेक होणार आहेत, अशी माहिती गुरुवारी झालेल्या महिला व बाल कल्याण समिती सभेत देण्यात आली.

सभापती पल्लवी राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली नाथ पै सभागृहात झालेल्या या सभेला प्रभारी अधिकारी विनीत म्हात्रे, सदस्य माधवी बांदेकर, सायली सावंत, श्वेता कोरगावकर, वर्षा कुडाळकर, पल्लवी झिमाळ, शर्वरी गांवकर यांसह तालुका प्रकल्प अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

डिजिटलसाठी मंजूर झालेल्या ९९ अंगणवाडी केंद्रांसाठी कुडाळ, कणकवली तालुक्यांमधून प्रत्येकी १३ तर मालवण, देवगड, वेंगुर्ले, दोडामार्ग व वैभववाडी या पाच तालुक्यांतून प्रत्येकी १२ अंगणवाडी केंद्र निवडण्यात येणार आहेत. या सुविधेसाठी अंगणवाडीला स्वत:ची इमारत, शौचालय व अन्य सुविधा असणे बंधनकारक आहे. अशा अंगणवाडी केंद्रांचा शोध घेऊन यादी तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या सभेत महिला व बाल विकास विभागाच्या महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या आधारभूत किंमती निश्चित करण्यात आल्या. सायकल ३८०० रुपये, घरघंटी १२ हजार ६०० रुपये, शिलाई मशीन ५३२५ रुपये, एमएससीआयटी ३५०० रुपये, फॅशन डिझायनिंग ३५०० रूपये, फळ प्रक्रिया ३३०० रूपये, ब्युटी पार्लर ३००० रूपये अशा प्रकारे प्रतिलाभार्थी अनुदान निश्चित करण्यात आले.

Web Title: ेक High-tech, Anganwada will be funded through district planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.