Eknath Shinde Cabinet Expansion: नारायण राणेंचे कट्टर विरोधक दिपक केसरकरांना थेट कॅबिनेट पदावर बढती; कोणते खाते देणार?
By अनंत खं.जाधव | Published: August 9, 2022 02:43 PM2022-08-09T14:43:39+5:302022-08-09T14:45:38+5:30
Deepak Kesarkar Biodata: केसरकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात सावंतवाडी रोटरी क्लब च्या अध्यक्षपदापासून झाली ते योगायोगानेच राजकारणात आले.
- अनंत जाधव
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करत असलेले आमदार दीपक केसरकर हे दुसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेत आहेत. यापूर्वी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यमंत्री पदाची शपथ घेतली होती तर आज त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेत आहेत.
केसरकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात सावंतवाडी रोटरी क्लब च्या अध्यक्षपदापासून झाली ते योगायोगानेच राजकारणात आले आणि ते 1992 93 च्या दरम्यान काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष झाले नंतर मात्र त्यांनी कधीही मागे वळून पहिले नाही सावंतवाडीचे नगराध्यक्ष नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशी वेगवेगळी पदे भूषवत असताना 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केसरकर पहिल्यांदा आमदार झाले.
मात्र 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार निलेश राणे यांना निवडणुकीत मदत करणार नसल्याची भूमिका घेतल्यानंतर त्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शी वाद झाले.आणि त्यांनी त्याचवेळी शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेने त्यांना सावंतवाडी मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली ते निवडून ही आले व पहिल्यांदाच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली केसरकर यांनी ग्रामविकास, अर्थ, गृह अशी वेगवेगळी राज्यमंत्रीपदे भूषवली होती.
ते जेव्हा 2019 मध्ये दुसऱ्यांदा केसरकर आमदार झाले तेव्हा पुन्हा मंत्री पदाची लॉटरी लागेल अशी त्यांना अपेक्षा होती पण महाविकास आघाडी सरकार मध्ये केसरकर यांना मंत्रीपदापासून लांबच ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांची नाराजी सर्वश्रुत होती.
त्यातच दीड महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार फोडून बंडखोरी केली त्यात केसरकर यांनीही सहभाग घेतला होता. त्यांच्यावर शिंदे यांनी आपल्या गटाची बाजू प्रसारमाध्यमांमध्ये मांडण्यासाठी मुख्य प्रवक्ते म्हणून नेमणुकही केली होती.त्याचवेळी केसरकर यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार हे निश्चित झाले होते. केसरकर यांनी गेल्या दीड महिन्यात शिंदे गटाची बाजू देशभरातील प्रसारमाध्यमांत कणखरपणे मांडली होती.
त्यामुळे शिवसेनेचे 40 बंडखोर आमदार तसेच 10 अपक्ष असे 50 आमदारांमध्ये कुणाकुणाला मंत्रिपद द्याचे हा जेव्हा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर उभा ठाकला तेव्हा त्यांनी केसरकर यांना झुकते माप देत पहिल्या टप्प्यात जे नऊ मंत्री शपथ घेत आहेत त्यामध्ये केसरकर यांनाही संधी देत आपला विश्वास सार्थकी लावल्याचे बक्षिस दिले.
नाव : दीपक वसंत केसरकर
जन्मतारीख: 18 जुलै 1955 (सावंतवाडी)
शिक्षण: बी.काॅम. डी.बी.एम
पक्ष : शिवसेना
वैवाहिक माहिती : पत्नी पल्लवी दीपक केसरकर
मुलगी : सोनाली दीपक केसरकर
व्यवसाय: बांधकाम व रिअल इस्टेट डेव्हलपमेंट रिसॉर्ट सिनेमागृह
कायमचा पत्ता : श्रीधर अपार्टमेंट एसटी स्टँड समोर
मु.पो.ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग 416510
राजकारणात प्रवेश: 1992 -1993
किती वेळा आमदार म्हणून निवडून आले : तीन वेळा (2009,2014,2019)
भुषवित असलेली पदे : आमदार (270 -सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ)
अध्यक्ष: रत्नसिधू योजना
अध्यक्ष:
भूषविलेली पदे : माजी राज्यमंत्री वित्त व नियोजन व गृह व ग्रामविकास
नगराध्यक्ष: सावंतवाडी नगरपरिषद
सदस्य : कोकण रेल्वे युजर्स सल्लागार समिती
सदस्य: बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली
सदस्य: राष्ट्रीय आरोग्य समिती
अध्यक्ष: सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामोद्योग मंडळ
संचालक: महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ
अध्यक्ष: रोटरी क्लब सावंतवाडी
संस्थापक सदस्य:भारत स्काऊट गाईड संस्था सिंधुदुर्ग
अध्यक्ष: नगरपालिका महासंघ महाराष्ट्र राज्य