निवडणूक आयुक्त सहारिया सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 05:17 PM2017-10-05T17:17:30+5:302017-10-05T17:17:35+5:30
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त व सचिव जे. एस. सहारिया हे सोमवार दिनांक ९ आॅक्टोंबर २0१७ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत.
सिंधुदुर्गनगरी दि. 0५ : राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त व सचिव जे. एस. सहारिया हे सोमवार दिनांक ९ आॅक्टोंबर २0१७ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत.
सोमवार दिनांक ९ आॅक्टोंबर रोजी सकाळी 11.30 वाजता मुंबईहून विमानाने गोवा येथे प्रयाण (जेट एअरवेज). दुपारी 12.40 वाजता गोवा येथे आगमन. दुपारी 02.00 कुडाळ येथे आगमन. सायंकाळी 04.00 वाजता कुडाळ येथे बैठक होणार आहे.
या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, नोडल अधिकारी व तहसिलदार हे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 05.30 वाजता पत्रकार परिषद होणार असून नंतर त्यांचा मुक्काम कुडाळ येथे असणार आहे. दिनांक १0 आॅक्टोंबर रोजी सकाळी 07.00 वाजता कुडाळ येथून ते कोल्हापूरकडे प्रयाण करणार आहेत.