निवडणूक निरीक्षक सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 05:06 PM2019-10-09T17:06:49+5:302019-10-09T17:08:21+5:30
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील २६८-कणकवली, २६९- कुडाळ व २७०-सावंतवाडी या तीन विधानसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गनगरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील २६८-कणकवली, २६९- कुडाळ व २७०-सावंतवाडी या तीन विधानसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यात सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून राजेंद्र किशन (आय.ए.एस.), निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून रविंदर कुमार (आय.आर.एस.) आणि निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून एम. साथीया प्रिया (आय.पी.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तिन्ही निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून राजेंद्र किशन, सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक यांचा संपर्क क्रमांक ०२३६२- २२३५८५ असा आहे. राजेंद्र किशन हे २४ आॅक्टोबर रोजीपर्यंत एम.आय.डी.सी. शासकीय विश्रामगृह, कुडाळ येथील सभागृहात दुपारी ३ ते ४ या वेळेत नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी उपलब्ध असतील.
निवडणूक खर्च निरीक्षक रविंदर कुमार यांचा संपर्क क्रमांक ०२३६२-२२३५६५ असा आहे. निवडणूक पोलीस निरीक्षक एम. साथीया प्रिया या २४ आॅक्टोबरपर्यंत वीणा मेस, पोलीस मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे सकाळी १० ते ११ या वेळेत उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक ०२३६२-२२८२२० असा आहे. उर्वरित कार्यालयीन वेळेत निवडणूक निरीक्षक हे निवडणूक निर्णय अधिकारी कणकवली, कुडाळ व सावंतवाडी यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिली आहे.