भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत यांची निवड

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 19, 2023 12:29 PM2023-07-19T12:29:33+5:302023-07-19T12:30:00+5:30

या पदासाठी महेश सारंग, प्रकाश मोर्ये यांच्यासह अनेकजण इच्छुक होते

Election of Prabhakar Sawant as Sindhudurg district president of BJP | भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत यांची निवड

भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत यांची निवड

googlenewsNext

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक व भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रभाकर सावंत यांची भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रदेश स्तरावरून करण्यात आली.

विद्यमान जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या ठिकाणी प्रभाकर सावंत यांना संधी देण्यात आली आहे. या पदासाठी महेश सारंग, प्रकाश मोर्ये यांच्यासह अनेकजण इच्छुक होते. मात्र त्या ठिकाणी प्रभाकर सावंत यांना संधी देण्यात आली. यापूर्वी ते जिल्हा सरचिटणीस पदावर कार्यरत होते. 

प्रभाकर सावंत हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. गेली अनेक वर्षे त्यांनी जिल्ह्यात भाजपाच्या विविध संघटनात्मक पदावर काम केले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने एक मराठा चेहरा समोर आणला असून प्रभाकर सावंत हे सर्वांना एकत्र घेऊन चालणारे नेतृत्व आहे. म्हणून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे.

Web Title: Election of Prabhakar Sawant as Sindhudurg district president of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.