उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे चुरस वाढली--वार्तापत्र वेंगुर्ले तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 09:49 PM2017-10-09T21:49:16+5:302017-10-09T21:52:37+5:30
वेंगुर्ले : तालुक्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. थेट सरपंच निवडीमुळे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे.
सावळाराम भराडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वेंगुर्ले : तालुक्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. थेट सरपंच निवडीमुळे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन ग्रामपंचायतींच्या सरपंचांची बिनविरोध निवड झाल्याने उर्वरित २१ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीत चुरस निर्माण झाली आहे.
सर्वच पक्ष रिंगणात उभे ठाकल्याने कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. सध्या तरी उमेदवारांनी व्यक्तिगत गाठीभेटींबरोबरच घरोघरी प्रचार करण्याच्या कामास सुरुवात केली असून कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत केळूस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किशोर बापू केळुसकर, तर पाल गावच्या सरपंचपदी श्रीकांत राजाराम मेस्त्री हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित २१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी ८० उमेदवार रिंगणात असून यामध्ये नऊ ग्रामपंचायतीत दुरंगी, पाच ग्रामपंचायतीत तिरंगी, दोन ग्रामपंचायतींमध्ये चौरंगी, तर पाच ग्रामपंचायतींमध्ये बहुरंगी लढत होणार आहे. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायतींवर पुरुष सरपंच, तर ९ ग्रामपंचायतींवर महिला राज दिसणार आहे.
वेतोरे, वजराट, म्हापण, मेढा, कोचरा, चिपी, आसोली, आडेली, कुशेवाडा या नऊ ग्रामपंचायतींत दुरंगी लढत पहावयास मिळणार आहे.
यात वेतोरे ग्रामपंचायतीमध्ये राधिका गावडे व स्नेहलता हळदणकर, वजराठमध्ये महेश राणे व सूर्यकांत परब, म्हापणमध्ये श्यामसुंदर ठाकूर व श्रीकृष्णा ठाकूर, मेढा येथे भारती धुरी व किशोरी टिकम, कोचरा येथे साची फणसेकर व कीर्ती गावडे, चिपीमध्ये साईनाथ माडये व गणेश तारी, आसोलीत सेजल धुरी व रिया कुडव, आडेली येथे प्रीती मांजरेकर व समिधा कुडाळकर, तर कुशेवाडा ग्रामपंचायतीत स्नेहा राऊळ व सुरेखा तेली आमने-सामने ठाकलेआहेत.
बहुरंगी लढतीची शक्यता
उभादांडा, शिरोडा, रेडी, परबवाडा, दाभोली या पाच ग्रामपंचायतींत बहुरंगी लढत पहावयास मिळणार आहे. उभादांडा ग्रामपंचायतीमध्ये देवेंद्र डिचोलकर, इलियास फर्नांडिस, गजानन नवार, रमेश नार्वेकर, बाबी नवार, ज्ञानदेव साळगावकर व हेमंत गिरप हे सात उमेदवार सरपंचपदासाठी नशीब आजमावणार आहेत.शिरोडा ग्रामपंचायतीतून प्रमोद नाईक, विजय नाईक, डेविड अल्फोन्सो, शिवराम गावडे, मनोज उगवेकर, प्रवीण धानजी, मयुरेश शिरोडकर, अमोल परब, दत्ताराम हाडये हे नऊ उमेदवार रिंगणात आहेत.रेडी ग्रामपंचायतीमध्ये अभिजित राणे, राजेंद्र्र कांबळी, पृथ्वीराज राणे, रामचंद्र्र कनयाळकर, गुणाजी मांजरेकर, रामसिंग राणे, बाळकृष्ण राणे, सुरेखा कांबळी व देविदास मांजरेकर हे नऊ उमेदवार रिंगणात आहेत.
परबवाडा ग्रामपंचायतीमधून कृष्णा टेमकर, श्रीकृष्ण तेरेखोलकर, विष्णू परब, समीर परब, विवेक नाईक, संजय परब, राधाकृष्ण गवंडे, सुंदर परब हे आठ उमेदवार सरपंचपदासाठी निवडणूक आखाड्यात आहेत, तर दाभोली ग्रामपंचायतीमधून नरेश बोवलेकर, गणपत राऊळ, प्रसाद हळदणकर, उदय गोवेकर, लवू शिरोडकर हे पाच उमेदवार रिंगणात आहेत.तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या २२१ जागांमधून ७१ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित सदस्यांच्या १५० जागांसाठी ३४२ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, पुरुष मतदार २२,२४६ व स्त्री मतदार २१,९२६ मिळून ४४,१७२ मतदार ग्रामपंचायतींच्या उमेदवारांचे भवितव्य ठरविणारआहेत.
तिरंगी लढत रंगणारपरूळेबाजार, पालकरवाडी, होडावडा, भोगवे व अणसूर या पाच ग्रामपंचायतींत तिरंगी लढत आहे. परूळेबाजार ग्रामपंचायतीमध्ये मुक्ता परुळेकर, श्वेता चव्हाण व रेखा परुळेकर, पालकरवाडी येथे विकास अणसूरकर, संदीप चिचकर व नंदकिशोर तळकर, होडावडा येथे अदिती नाईक, विनया दळवी व रूपल परब, भोगवे येथे सुनील राऊत, रूपेश मुंडये व चेतन सामंत, अणसूरमध्ये अन्विता गावडे, संयमी गावडे व साक्षी गावडे अशा तिरंगी लढती होणार आहेत.
मठ व तुळस या दोन ग्रामपंचायतींत चौरंगी लढत होणार आहे. यामध्ये तुळस ग्रामपंचायतीमधून संदीप पेडणेकर, कृष्णा तुळसकर, शंकर घारे व महादेव तांडेल, तर मठ ग्रामपंचायतीमधून अजित नाईक, नित्यानंद शेणई, तुळशीदास ठाकूर व दत्ताजी गुरव रिंगणात आहेत.