ओटवणेतील ग्रामस्थांकडून वीज अधिकारी धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 04:59 PM2020-08-12T16:59:21+5:302020-08-12T17:00:52+5:30
वीज वितरण कंपनीकडून आकारण्यात आलेल्या अव्वाच्या सव्वा वाढीव वीज बिलांसह ओटवणे गावातील वीज समस्यांबाबत ओटवणे ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले. सावंतवाडीत वीज अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांनी याबाबत जाब विचारला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी विजेच्या समस्यांचा पाढाच वाचला. वीज मीटरचे अचूक रिडींग न घेता काढलेल्या भरमसाठ वीज बिलांबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
सावंतवाडी : वीज वितरण कंपनीकडून आकारण्यात आलेल्या अव्वाच्या सव्वा वाढीव वीज बिलांसह ओटवणे गावातील वीज समस्यांबाबत ओटवणे ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले. सावंतवाडीत वीज अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांनी याबाबत जाब विचारला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी विजेच्या समस्यांचा पाढाच वाचला. वीज मीटरचे अचूक रिडींग न घेता काढलेल्या भरमसाठ वीज बिलांबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
सोमवारी ओटवणे येथील ग्रामस्थ सावंतवाडीतील वीज वितरणच्या कार्यालयात आले. त्यांनी उपस्थित अधिकाºयांवर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी त्यांनी निवेदनही दिले.यावेळी सरपंच उत्कर्षा गावकर, उपसरपंच उज्ज्वला बुराण, माजी उपसरपंच बाबाजी गावकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नमाला गावकर, महेश चव्हाण, धाकू बोर्ये, प्रमोद गावकर, उमेश गावकर, संजय कविटकर, सिद्धेश गावकर, बाबा मळेकर, दशरथ गावकर, सदाशिव गावकर, बाळकृष्ण भगत, साक्षी कविटकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून अखेर बुधवार १२ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता ओटवणे ग्रामपंचायत कार्यालयात वीज कर्मचारी पाठवून वाढीव बिले कमी करण्याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही वीज उपअभियंता यादव यांच्या आदेशानुसार धोत्रे यांनी दिली. ओटवणे गावातील वीज समस्या सोडविण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.