Sindhudurg- वीज कर्मचाऱ्यास मारहाण: ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष मुक्तता 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: January 31, 2024 05:52 PM2024-01-31T17:52:32+5:302024-01-31T17:53:28+5:30

सिंधुदुर्ग : महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी ओसरगांव खासकीलवाडी येथील निखील सुहास कुलकर्णी याची अतिरिक्त जिल्हा ...

Electricity worker assault, Suspect acquitted for lack of solid evidence | Sindhudurg- वीज कर्मचाऱ्यास मारहाण: ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष मुक्तता 

Sindhudurg- वीज कर्मचाऱ्यास मारहाण: ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष मुक्तता 

सिंधुदुर्ग : महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी ओसरगांव खासकीलवाडी येथील निखील सुहास कुलकर्णी याची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

दि. १३ जानेवारी २०१८ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ कृष्णा हनुमान सावंत आणि वायरमन प्रदीप मेस्त्री आणि उदय किंजळे हे ओसरगावचे आहेत. येथील विद्युत ग्राहक प्रवीण नाईक यांच्या शेतीपंपाबाबतच्या तक्रारीसंदर्भात ओसरगांव येथे गेले होते. पंपाची दुरुस्ती करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरवरून विद्युत पुरवठा खंडित करण्याची गरज होते. म्हणून कृष्णा सावंत यांनी सकाळी विद्युत पुरवठा बंद केला. 
संशयित निखील कुलकर्णी यांची पोहा मिल असल्याने व अचानक विद्युत पुरवठा बंद झाल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागले. रागातून कुलकर्णी यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत कोणाला विचारून विद्युत पुरवठा बंद केला, अशी विचारणा केली. तसेच मारहाण करून दुखापत केली व कुंपणावर ढकलून दिले. 

याबाबत फिर्यादींनी येथील पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीत पाच साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, फिर्यादी यांचे ओसरगांव हे कार्यक्षेत्र असल्याबाबत कोणताही ठोस पुरावा सादर न केल्याने व आरोपीने शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण केला व दुखापत केली, याबाबत ठोस पुरावा न आल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

Web Title: Electricity worker assault, Suspect acquitted for lack of solid evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.